राजा (सामान्य जनता)
सामान्य माणसाच्या जीवावर सगळे श्रीमंत झालेत .चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार करोडपती झालेत कारण सिनेमा बघायला सामान्य जनता जर गेली नाही तर ते करोडपती कुठून होणार. सामान्य माणसाचा एक एक पैसा त्यांच्या तिजोरीत जातो व करोडपती बनतात .राजकारणामध्येही सामान्य माणसाच्या मताला फार किंमत आहे सामान्य माणसाचे मत सरकार बदलू शकते किंवा वाचवू शकते .जे व्यापारी आज मालामाल दिसतात ते सामान्य माणसाच्या जीवावरच .टी व्ही वरील मालिका बनवल्या जातात व सामान्य माणसांनी प्रतिसाद दिल्यानेच त्या हिट होतात व त्यामुळेच त्या कलाकारांना पैसे मिळतात. जाहीरात बाजीचे जे पेव फुटले आहे ते सामान्य माणसांनी खरेदी कराव्यात त्यांच्या वस्तू हाच हेतु त्यांचा असतो म्हणून विकासाला सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू आहे त्याच्या पैशांवर बरेच श्रीमंत झालेत पण तो मात्र गरीबच राहिला हे मात्र सत्य आहे .ट्रेन बस रिक्षा यामध्ये जो पैसा येतो तो सामान्य माणूस प्रवास करतो म्हणूनच त्याच्यामुळेच मोठे झालेले लोक ऐशआरामात राहतात पण तो मात्र रोज जगण्यासाठी धडपड करत असतो अनेक संकटाचा सामना त्याला करावा लागतो सामान्य माणसाचे जगणे जेव्हा ऐशआरामात होईल तेव्हा त्याच्या पैशांचा मोबदला मिळाला असे म्हणता येईल
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment