निवृती व बदललेला माणसांचा दृष्टिकोन
एका ठिकाणी माणूस 30 - 35 वर्ष प्रामाणिकपणे काम करतो व अनेक मित्र जोडतो .रोज कामावर आल्यावर एकदम हलकं फुलकं वातावरण तयार होते .गप्पा गोष्टी हसत खेळत काम करायला मजा येते काहींना सुट्टी असली तर घरी बोर होते पण कामावर मित्रांच्या सहवासात मजा येते असे करता करता अनेक वर्ष कुठे निघून जातात तेच कळत नाही व शेवटी निवृतीचा दिवस येतो .अनेक मित्रांना वाईट वाटते तर काहींना आनंद वाटतो त्याच्या निवृतीने .मग एकदम आयुष्य बदलते .एकाएकी वाटते मित्रांबरोबर हसत खेळत जाणारा दिवस आता बोर वाटू लागतो .दिवस जाता जात नाही मग याला मित्रांची आठवण येते मग ठरवतो की आपण कामाच्या ठिकाणी जावून यायचे .तेथे गेल्यावर अनेक लोकांना आनंद वाटतो त्याला गराडा घालतात .खुशाली विचारतात चहापाणी घेतात पण काही लोकांच्या भुवया उंचावतात व विचार करतात की काय काम असेल व परक्या भावनेने बघतात जसं काय त्याची व याची कधी ओळख होती की नाही.व निवृत व्यक्तीलाही परक्याची भावना निर्माण होते मग परत दोन दिवसांनी तीच व्यक्ती परत आली तर होणारा गराडा कमी दिसतो व अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की कशाला आला असेल .त्याला आपली आठवण येते म्हणून आला असेल ही कल्पना कुणीच करत नाही त्यामुळे बरेच निवृत झालेले लोक सहसा परत कधीच येत नाही .पण असे व्हायला नको निवृत जरी झालेत व केव्हाही आलेत तरी त्यांचे तेवढेच स्वागत व्हायला हवे पण लोकांच्या दृष्टिकोनात एवढा बदल येतो की एकदा निवृत झाला की मग कशाला आला असेल काय काम असेल असे नानाविध प्रश्न निर्माण होतात .निवृती म्हणजे काहींना पावसाळ्यानंतर आलेला उन्हाळा वाटतो तर काहींना उन्हाळा नंतर आलेला पावसाळा वाटतो पण निवृतीनंतरचे जीवन व आधीचे जीवन यात जमीन आसमानचा फरक असतो .बर जर पेंशन बर्यापैकी असेल तर मग सगळीकडे घरात बाहेर मान मिळतो पण पेंशन नसेल तर मग सगळीकडे किंमत शुन्य होते काहींना निवृतीनंतर भरपूर पैसा मिळतो मग मुलांना व्यवस्थित नोकरी नसेल तर त्यांचा डोळा त्या पैशांवर असतो बरेच जण मुलांवरील प्रेमापायी तो पेसा मुलांना घर गाडी घ्यायला देऊन मोकळे होतात व रिकामे होतात मग स्वत:ला पैसा लागत असेल तर मुलांपुढे हात पसरावा लागतो व मुले कानाडोळा करतात व याला मग पश्चाताप होतो की उगीचच आलेला पैसा मुलांच्या स्वाधीन केला म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्या जवळ असलेला पैसा हा आपल्याजवळच असला पाहिजे मुलांना मदत करावी पण सगळंच देऊन मोकळे होऊ नये एकदा मोकळा झालात की मग तुमची किंमत शून्य जेव्हा तुम्हांला वाटेल मला हे घ्यायचे ते घ्यायचे इकडे जायचे तिकडे जायचे तेव्हा तुमचा पैसा तुम्हांला कामी यावा कुणाकडे मागायची गरज नको नाहीतर तुमच्यात व मुलांमध्ये उतारवयात पैशांमुळे वाद होतो असे होऊ नये यासाठी मुलांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा त्यांना समजून सांगायला हवे व बॅलन्स साधता यायला हवा आपल्या नातवंडाना मुलांना सुनेला जावईला विविध प्रसंगी भेटवस्तू देता आली पाहिजे म्हणजे तुमच्याबद्दल असलेले प्रेम वाढेल व त्याउलट पैसा हा बाळगळला व त्याचा उपयोग ना स्वत:ला व कुणाला केला नाही तरी किंमत शून्य होते म्हणून निवृतीनंतरचे जीवन कसे असले पाहिजे हे आधीच ठरवले तर मग नियोजन करायला सोपे जाते व सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढची दिशा ठरवली पाहिजे नाहीतर ना घरका ना घाटका--- अशी अवस्था होऊन जाते .बघा पटतं का
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment