प्रिय दादास
आज मला तुला खास लिहावसं वाटल म्हणून लिहितो आहे आज तुझा शेवटचा नोकरीतला दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे ज्या नोकरीच्या जीवावर माणूस सुखं उपभोगतो त्या नोकरीचा शेवटचा दिवस तसा त्रासदायकच म्हणता येईल नोकरीचे ठिकाण म्हणजे आपले दुसरे घरच असते जेथे आपण आपल्या सहकार्याबरोबर सुख दु:ख सांगत असतो व त्याने मन हलकं होते व जीवन जगायला प्रेरणा मिळते अनेक वर्ष आपल्या सहकार्याबरोबर काढल्याने विशेष नातं निर्माण होते व अशा सर्वांना निरोप देणे म्हणजे कल्पनाही करवत नाही पण शेवटी प्रत्येक गोष्टींचा शेवट ठरलेलाच असतो आपण सकारात्मक घेतले तर आजचा दिवस आनंदाचाच म्हणावा लागेल कारण नोकरीमुळे आपल्याला कुटूंबाला वेळ देता आला नाही पुरेसा .तो देता येईल तसेच फिरायला कुठे जाता आलं नाही ते ही करता येईल. अनेक नातेवाईक मंडळींना भेटता येईल आणि नोकरीमुळे अनेक आवडीच्या गोष्टी करता आल्या नाहीत त्याही करता येतील व पुरेसा वेळ देता येईल तब्बेतीकडेही लक्ष देता येईल .खाणे पिणे मनासारखे करता येईल व मुलांना थोडा आधार देता येईल नातवंडामध्ये कुठे वेळ जाईल ते कळणार नाही .भरपूर वेळ झोप काढता येईल अशा प्रकारे आयुष्य मजेत घालता येईल व जीवनाचा आनंद लुटता येईल .जी आपल्याला आवड आहे ती जोपासता येईल वेळोवेळी मलाही आपले मार्गदर्शन लाभले व माझ्याही सुखदु:खात सामील झालात व वेळोवेळी मदतीचा हात दिला त्यामुळे आज मी येथेपर्यंत पोहोचलो म्हणून मी कायम आपला रूणी राहीन . माझ्याकडून व माझ्या कुटूंबाकडून भरपूर शुभेच्छा व उर्वरीत आयुष्य निरोगी सुखीसंपन्न जावो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो .दादा जय हो .
तुझाच भाऊ
नंदु बोरसे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment