Skip to main content

फॅड क्लासेसचे

क्लासचे फॅड
पूर्वी जर एखाद्याने क्लास लावला तर लोक त्याला वेड्यात काढायचे की मठ्ठ असल्याने समजत नसेल शाळेत किंवा काॅलेजमध्ये म्हणून लावला असेल व त्याच्याकडे वाईट दृष्टीने बघितले जायचे पण आज उलटं झालं जर एखाद्याने क्लास लावला नसेल तर त्याची परिस्थिती गरीबीची असेल पैसा नसेल म्हणून लावला नसेल असे समजले जाते पण तो हुशार आहे स्वत:अभ्यांस करायची त्याची तयारी आहे शाळैतल्या व काॅलेजवरच्या शिक्षकांवर त्याचा विश्वास आहै मग क्लास की गरज त्याला वाटतं नाही पण क्लास म्हणजे एक फॅड तयार झाले क्लासला जाणारे सगळेच मुलांना चांगले मार्कस मिळतात असे मुळीच नाहीपण पालकांना अभिमानाने सांगता येते अमुक क्लासला जातो पण क्लास मध्पे जे शिकवतात त्याच्यापेक्षाचांगल्या प्रकारे शाळेत व काॅलेजमध्ये शिकवले जाते कारण बरेच शिक्षक अनुभवी असतात माॅडरेटर असतात कुणी चिफ माॅडरेटर असतात .पण फी दिली क्लासमध्ये म्हणजे आपल्या मुलाचे करियर झालैच असे समजले जाते स्पर्धा परिक्षेसांठी तयारी म्हणून ठिक आहे पण पहिली पासून क्लासला मुले जातात पुढे पुढे मग दहावी बारावी साठी तर क्लासवाल्यांनी अवांच्या सव्वा फी ठेवलेली असते त्यांचे पॅकेज असते नववी व दहावी एकत्र मग एवढे लाख .रोख एकदम भरले की discount थोडे देणार.तसेच अकरावी बारावी jee तसेच cet असे पॅकेज घेतले तर एवढे लाख लागणार .ज्यांच्याकडे पैसा आहे ते भरुन मोकळे होतातव एवढा पैसा ओतला म्हणजे तो मुलगा चमकेलच असे सांगता येत नाही त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा नाही त्या मुलांना मग वाईट वाटते .क्लासवाले फक्त portion पूर्ण करतात मग परिक्षा परिक्षा घेत सूटतात शेवटी त्या विद्यार्थ्यालाच अभ्यांस करावा लागतो व मुळातच ज्या विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असते त्यांनी क्लास लावला काय व नाही लावला त्याला मार्कस मिळतातच पण श्रेय जाते क्लासवाल्यांना .गल्लोगल्ली क्लास दिसायला लागले त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षकांवर भरवसा नाही पण जे मुले रेग्यूलर जातात शाळैत किंवा काॅलेजमध्ये त्यांना क्लासची गरजही राहणार नाही पण फॅडमुळे हे चालले आहे व भरमसाट फी भरल्याने ते थोडे सिरियस बनतात व यश मिळवतात पण क्लास न लावताही सिरियस झाले तरीही त्यांना चांगलेच मार्कस मिळणार बर्‍याच वेळा एवढी फी भरूनही मुले काॅलेजमधील terminal  n prelim परिक्षेत नापास होतात तेव्हा पालकांना धक्का बसतो व मग जमिनीवर येतात प्रात्यक्षिक परिक्षाच्या मार्काच्या आधारे ते कसेबसे पास होतात व मग क्लासच्या नावाने ओरडतात   .हे फॅड रोखणे फार अवघड आहे व हा बाजार जो मांडला आहे तो थांबवणे हे ही अवघडच.पूर्वी चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश व साधारण क्लास लावायचे आता साधारण काॅलेजमध्ये प्रवेश व std. क्लास असे समिकरण झाले .पालक व विद्यार्थ्यांची मनस्थिती तशीच झाली आहे .यावर विचार करायची फार गरज आहे
प्रा दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...