गोकुळअष्टमी
बाळ जन्मला माता देवकी पोटी
झाला तो यशोदेचा कृष्ण
केल्या त्याने बाळ लिला
अवघे झाले आनंदी जन
पुतना राक्षसीनीला दाखवले
खरे आसमान
कंसा सारख्या दृष्टाला
केले भुमिसमान
गवळणी झाल्या होत्या वेड्या
कृष्ण घ्या म्हणत होत्या बाजारी
कृष्ण हेच होते त्यांचे जग
राधा ही झाली होती बावरी
केला दुर्जनांचा त्याने नाश
पाठवले त्यांना यमसदनी
सिध्द केले मीच आहे देव
प्रसिध्द आहे त्यांची वाणी
उचलला पर्वत द्रोणागिरी
केले लोकांचे रक्षण
हाच आहे खरा देव
म्हणून इंद्र आला शरण
अर्जुनाला सांगितली गीता
ती आजही उपयोगी आहे मानवाला
आहे शब्दांमध्ये तेवढे सामर्थ्य
आकार देते ती जीवनाला
द्रोपदीसाठी धावून आला
राखली त्याने तिची लज्जा
खरा भाऊ शोभला तो
कृष्ण म्हणताच घेतो मनावर कब्जा
सुदामाच्या मुठभर पोह्यांसाठी
दिली त्याने सोन्याची नगरी
मित्रप्रेम दिले दाखवून जगाला
मिटवुन टाकली गरीब श्रीमंत दरी
पांडवाचा होता आदर्श कृष्ण
राहिला त्यांच्या कायम पाठीशी
युध्द त्याने जिंकून दिले
सत्याचा विजय हे ठेवले मनाशी
दहीहंडी फोडून दिला
मित्रांना अवघा आनंद
आजही साजरा करतात
त्यामुळे होतो परमानंद
मीराही झाली होती कृष्णमय
दिसत नव्हते त्याच्याशिवाय काय
भजनात व्हायची खूप दंग
प्रकट होण्याशिवाय नव्हता त्याला प्रयाय
कृष्ण कृष्ण म्हणता
लागते ब्रम्हानंद टाळी
व्हावे त्याच्या भजनात तल्लीन
अवघे सुख येईल भाळी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment