स्वत:शिवाय कुणाला जास्त माहीती?
बर्याच वेळा आपली तारीफ दुसरा कुणीतरी करतो तेव्हा आपण हुरळून जातो व जेव्हा आपली निंदा होते तेव्हा आपण कोलमोडून पडतो दु:खी होतो म्हणजे आपण नक्की कसे आहोत हे लोक ठरवतात व त्याप्रमाणे आपली मानसिक स्थिती ठरते पण जरी लोकांनी आपली तारीफ केली किंवा निंदा केली तरी आपण नक्की कसे आहोत हे आपल्याशिवाय कुणालाच जास्त माहीत नसते .काहीवेळा लोक तारीफ करतात आपली एखाद्या कामाबद्दल किंवा यशाबद्दल पण ते यश कसे मिळवले तसेच ते काम कसे केले हे आपल्यालाच माहीत असते म्हणून लोक तारीफ करायला लागले की लगेच आपल्या मनात आपण ते काम कसे केले किंवा तसे गुण आपल्यात नक्की आहेत का किंवा लोक जे तारीफ करतात ते खरंच आपण न्याय दिला का याचे उत्तर आपले मन द्यायला सुरवात करते खरंच आपण तारीफला योग्य आहोत असे आपल्याला मनापासून माहीत असेल तर आपल्याला आतून शांत व आनंदी मेहसूस होते पण जर का आपण त्या योग्यतेचे नाहीत पण तरी लोकांना माहीत नसल्याने ते तारीफ करतात तेव्हा आपल्याला आतून शांत वाटत नाही व आनंदही होत नाही म्हणून आपल्या आत एक न्यायदेवता बसली आहे ती आपल्याला वेळोवेळी सांगत असते की आपण नक्की कसे आहोत .काहीवेळा लोक निंदा करतात कारण त्यांना खरं माहीत नसते आपल्याबद्दल पण आपल्याला माहीत असते की आपण खरं काय केले त्यामुळे दु:खी होण्याची गरज नसते म्हणून निंदा किंवा स्तूती कुणी कितीही केली तरी हूरळून किंवा कोलमोडून जाण्याची गरज नसते कारण आपण नक्की कोण हे आपल्याशिवाय कुणालाच माहीत नसते म्हणून स्वत:लाच विचारावे की हे खरं की खोटं त्याप्रमाणे स्वत:त बदल घडवून आणायला सोपे जाते म्हणून आपले बटन कुणाच्या हातात देऊ नये जेव्हा वाटेल तेव्हा तो आपल्याला आनंदी किंवा दु:खी करू शकतो .आपण ठरवावे की कधी आनंदी व्हावे व कधी दु:खी व्हावे हे जरा अवघड आहे पण अशक्य मात्र नाही .बघा जमतं का व पटतं का
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment