स्वत:ची शांतता
आपली शांतता बर्याच वेळेला आपल्या हातात असते समजा आपल्याला कुठे जायचे आहे ट्रेनने व टिकिट काढले नाही व हे ही माहीत आहे की टीसी सहसा येणार नाही तरी टीसी येणार कधीपण हा विचार माणसाला सुखाने प्रवास करू देणार नाही म्हणून मनाच्या शांततेसाठी तिकिट न काढणे म्हणजेच आपलेच नुकसान व पर्यायाने देशाचे .काही वेळा जेथे आपण काम करतो व त्या कामाचेच आपल्याला पैसे मिळतात अशा ठिकाणी बाॅसला न घाबरता स्वत:ला धाबरले पाहिजे स्वत:च्या मनाची शांतता भंग पावते जर आपण आपले काम व्यवस्थित केले नाही तर मनाची शांतता भंग पावते त्यामुळे ती टिकवण्यासाठी कामात चुकारपणा येता कामा नये. जो पगार मिळतो तो आपल्या कामाचा असतो म्हणून काम हे प्रामाणिकपणे केले पाहिजे त्यामुळे मनात शांतता पसरेल व स्वत:ला प्रसन्न वाटेल व शांत झोप लागेल कुणी संकटात असताना त्याला केलेली मदत हा उपकार त्याच्यावर नसून तो आपला आपल्यावरच केलेला असतो कारण त्याला मदतीचा हात दिल्याने आपल्या मनात शांतीचा रस पाझरतो त्यामुळे आपल्याला शांत वाटते तसेच घरातील लोकांशी अप्रामाणिक राहिलात तर आपले मन कधीच शांततेचा अनुभव घेऊ शकणार नाही त्यामुळे स्वत:ला शांतता हवी असेल तर घरातील लोकांपासून काहीही लपवून ठेवू नये तसेच चुकीचे काम करू नये. काही जण निगरगठ्ठ असतात त्यांना काहीही वाटत नाही कसेही वागले तरी अशा लोकांचा व शांतीचा काहीही संबंध नसतो अशा लोकांसाठी हे सांगणे म्हणजे निरर्थकच ज्यांना शांतीने जीवन जगायचे आहे अशा लोकांसाठी हे लागू पडते बघा पटतात का विचार
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment