विभागणी
जेथे जेथे माणूस आहे तेथे तेथे एकत्र दिसतो पण नसतो मग कोणतेही आॅफिस असू द्या किंवा राजकारण किंवा कोणतेही क्षेत्र असू द्या प्रत्येक ठिकाणी ग्रूप तयार झालेत व ह्या ग्रूपच्या मुळेच एकसंघ माणूस प्रगती करू शकत नाही एका ग्रूपमध्ये झालेले सुख दुसर्या ग्रूपमध्ये दुख वाटायला लागते व एका ग्रूपमध्ये झालेले दु:ख दुसर्या ग्रूपला सुख वाटायला लागते पण एका ग्रूपच्या डोळ्यात आलेले दु:खाचे अश्रू दुसर्या ग्रूपने पुसावेत अशी कधी वेळच येत नाही माणूस कितीही शिकला तरीही ग्रूप बनवण्यात जास्त पटाईत झालेला असतो वैचारिक मतभेद असावेत पण माणसातले भेद नसावैत ग्रूपमुळे माणूस विभागला गेला मग तो धर्माच्या बाबतीत असो जितीच्या बाबतीत असो नाहीतर विचारांच्या बाबतीत असो .दूरून दिसणारे सुंदर चित्र जवळ आल्यावर भेसूर वाटायला लागते दुसर्याची स्तुती करायला हिंमत लागते पण माणूस ती हिंमत हरवून बसला पण दुसर्याची निंदा नालस्ती करण्यात काही मात्र पटाईत असतात .हा ग्रूपचा अविभाज्य पणा कधीही एक होणार नाही सगळिकडे नसेल पण 95% मात्र सगळिकडे दिसतो
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment