Skip to main content

अजून वय कुठे झाले

अजून वय कुठे झाले
ज्यावेळी भक्तीमार्गाचा अभ्यांस करतो ज्ञानेश्वरी वाचतो संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यांस करतो किर्तन ऐकतो अभंग पाठ करतो ते आचरणात आणतो देऊळात जातो तिर्थयात्रेला जातो .ग्रंथांचे पारायण करतो एकादशीचेव्रत करतो तुळशीची माळ घालतो अध्यामबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो संसंगाला जातो तेव्हा हेच ऐकायला मिळते बर्‍याच जणांकडून की अजून वय कुठे झाले हे करण्यासाठी म्हणजे हे सर्व करणे म्हणजे वय झालेल्या माणसांचे लक्षण आहे असे बर्‍याच जणांना वाटते वरील गोष्टी करणे म्हणजे बुरसटलेले  विचार  असे त्यांना वाटते पण फार अज्ञानात आहेत असे लोक असे मला वाटते कारण वय होईपर्यंत जगणार याची शाश्वती देता येत नाही व वय झाल्यावर सर्व अवयव क्षीण होतात मग गुडघे दुखतात मणके दुखतात चालतांना त्रास होतो अनेक आजार जडतात स्मरणशक्ती कमी होते  अशावेळी कोणत्याच गोष्टी करता येणार नाहीत पण तारूण्यात जोश असतो हवे तेथे जाता येते  हवे ते करता येते व वरील सर्व गोष्टी तारूण्यात केल्या की मग अनुभव येऊ लागतात व आपली श्रद्धा बळकट होते शरीर व मनाला गोडी लागते व त्याचा फायदा उतारवयात होतो त्यामुळे उर्वरीत आयूष्य चांगले जाते अध्यात्म म्हणजे काय हे पाठ करण्यापेक्षा स्वत:अनुभव घेऊ शकतो मग मला सांगा ज्ञानेश्वर महाराज व त्यांचे भावंड हे काय म्हातारे होते ?तरुणपणातच त्यांनी सर्व ज्ञान आत्मसात केले व जगाला दिले स्वत:अमर झालेत व जगाला ज्ञान देऊन गेलेत संत तुकोबा किंवा बाकीचे संत हे काय वय झाले म्हणून भक्तीमार्गाला लागले काय? तरूणपणातच तुकोबांनी अभंग रचले व प्रचिती अनुभवली की देव पहावयासी गेलो तो देवच होऊन ठेलो .विवेकानंद काय वय झाल्यामुळे रामकृष्ण परमहंसाकडे गेले होते काय? ऐन तारूण्यातच सर्व अनुभव त्यांनी घेतले .म्हणून आपले अजून वय कुठे झाले असे म्हणणे म्हणजे अज्ञानाचा महामेरूच म्हणावा लागेल पण ही अध्यात्माची गोडी कुणालाही सहज लागत नाही त्याबद्दल एकनाथ महाराज म्हणतात पूर्व सुकूर्ताचा पूर्ण अभ्यांसाचा दास सदगुरूंचा तोचि जाणे .त्यामुळे हा मार्ग तरूणपणातच गवसला पाहिजे मग विविध अनुभव येऊन आश्चर्यचकित होणार व आपल्या व्यक्तीमत्वामध्ये प्रचंड बदल होणार .ज्याला या मार्गाबद्दल काही माहीत नसेल किंवा त्याचा विश्वास नसेल तर मग ती व्यक्ती कितीही ज्ञानी असेल तरी त्या व्यक्तीबद्दल तुकाराम महाराज म्हणतात आणिक  नोव्हे माझ्या मना हो का पंडीत तो शहाणा म्हणून वय होण्याची वाट न बघता    हे अनुभव घेऊ या .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...