प्रेमभाव स्वार्थीभाव व निस्वार्थीभाव
प्रेमभाव : हा भाव मनात निर्माण झाला की आत शांती नांदायला येते .शांती आली की तिची बहिण लक्ष्मी व सरस्वती मागोमाग येतात मग तो जगदिश्वर यांच्या मागोमाग येतो व हे सर्व आल्यावर माणसातला द्बेष मत्सर अहंकार गर्व गळून पडतात व जग हे सुंदर दिसायला लागते
स्वार्थभाव: हा भाव प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असतो पण ज्यांच्याकडे हा भाव प्रमाणाबाहेर असतो ती व्यक्ती स्वत:चा फायदा काय असा विचार प्रत्येक गोष्ट करतांना दिसते .आपण दुसर्यासाठी केल्यावर त्याच्याकडून काय फायदा होईल याचा विचार करते व जर फायदा होणार असेल तरच ती दुसर्यासाठी काहीतरी करते .काहीजण स्वार्थाने एवढे आंधळे होतात की समोरच्याला इजा पोहचून दु:ख देऊन आपला स्वार्थ साधतात . दुसर्याच्या भावनांचा चक्काचूर करतात आपल्या स्वार्थापायी .आज एकमेकांमध्ये शत्रूत्व निर्माण झाले आहे ते फक्त स्वार्थापोटी .स्वत:च्या स्वार्थासाठी नातेगोते संबंध हे थिटे पडतात हा स्वार्थीभाव प्रमाणापेक्षा जास्त ज्यांच्याजवळ असतो त्यांच्या जवळ शांती कधीच फिरकत नाही जेथे शांती नसते तेथे मग बाकी काहीही नसते .लक्ष्मी व सरस्वती जास्त काळ तेथे थांबत नाहीत.
निस्वार्थभाव:सर्व भावांमध्ये जर कुणी श्रेष्ठ असेल तर तो म्हणजे निस्वार्थभाव .हा भाव असणारी व्यक्ती सर्वात श्रीमंत व्यक्ती असते .मी जे कुणासाठी करणार त्याबदल्यात मला काहीही नको असा भाव म्हणजे निस्वार्थवृती .त्यामुळे अपेक्षाभंगामुळे येणारे दु:ख येत नाही .जे केले ते लगेच विसरल्यामुळे अहंभाव निर्माण होत नाही .त्या बदल्यात अपेक्षा न केल्यामुळे फळाची वाट बघण्यात वेळ बघायची गरज नाही पण जरी फळाची अपेक्षा आपण केली नाही तरी निस्वार्थकर्माने सर्वश्रेष्ठ फळ मिळत असते .आपले शरीरही निस्वार्थ कर्म करत असते .एखादा आंबा आपले डोळे बघतात हात त्याला उचलतात दात चावतात व पोटात ढकलतात पोटात पचन होते .पचन होईपर्यंत कुणीच काहीच अपेक्षा केलेली नसते फळाची पण पचन झाल्यावर त्यापासून रक्त बनते व ते प्रत्येक अवयवांपर्यंत पोहचते व सर्व अवयवांना उर्जा प्राप्त होते म्हणजे निस्वार्थ कर्माचे हे फळ आहे .म्हणून निस्वार्थाने मिळणारे फळ हे सर्वश्रेष्ठ टिकावू असते
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment