नशीब माणसाचे आयुष्य असते 100
नशीबच म्हणावै लागेल की माणसाचे आयुष्य असते जास्तीत जास्त 100 कारण एखादा माणूस एवढा क्रुर असतो की त्यामुळे सगळै थरथर कापतात त्याच्यामुळै होतात घातपात खून मारामार्या चोर्या व त्याला पकडणे काही सोपे नसते .कोणताही उपाय करून सापडत नाही व त्यालाही वाटते की मला कुणीच पकडू शकत नाही किंवा माझ्यापर्यंत कुणीच पोहचू शकत नाही पण काळ हा सगळ्यांचा बाप आहे .शंभर वर्ष झाल्यावर वयामुळे त्याच्यावर काळ झडप घालतो व त्याचा नाश होतो .काळापासून कुणीच वाचू शकत नाही .एक ना एक दिवस काळ आपल्या तावडीत त्याला पकडतो .आतापर्यंत किती क्रूर लोक होऊन गेलेत व काळाच्या पडद्याआडपण कधीच गेलेत त्यांचे नामोनिशान राहिले नाही म्हणून सत्तेचा वापर पैशांचा वापर व ताकदीचा वापर हा गरजू लोकांसाठी केला तर खरा वापर झाला असे म्हणता येईल पण असे घडतांना दिसत नाही लोक पैशांचा वापर सत्तेचा वापर व ताकदीचा वापर लोकांना छळण्यासाठी करतात त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी करतात कारण 100 वर्ष हा आकडा ते विसरतात. म्हणून कुणी कितीही खतरनाक असेल त्याला काळ हा नष्टच करत असतो एक दिवशी.कोणतेही हत्यार न चालवता काळ त्याला गिळंकृत करतो .आजपर्यंत अनेक लोक अनेकांच्या जीवावर उठले पण काळाने त्यांनाही सोडले नाही म्हणून अतिरेकीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत पण त्यांची 100 भरायची वाट न बघता त्यांना संपवले पाहिजे पण एखादा लपून बसला व सापडत नसेल तर मग काळ त्याला त्याची 100 वर्ष भरल्यावर आपोआप संपवतो.म्हणून काळापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही .आपले अस्तित्वच कायमस्वरूपी नाही व एखाद्या भुभागावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो .तो भुभाग स्थिर असतो पण त्याच्यासाठी किती लोक आलेत व गेलेत ,भुभाग बळकवण्याची परंपरा छोट्या गावातून होते .गावात शेताचे बांध फोडून शेत वाढवतात मग शहरातही असे फोडाफोडीचे काम केले जाते मग हळूहळू राष्र्ट पातळीवर दुसर्या राष्र्टाचा भुभाग मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होतात .माणूस शांतीने जीवन जगण्याचे सोडून काहीतरी कुरापती करत असतो .माणसाने माणसांचा सन्मान केला असता तर मग युद्ध वगैरे असे काही झालेच नसते .पोलीसांची जवानांची गरजच राहिली नसती.तसेच माणसाचे निवृतीचे वय 58 व काही ठिकाणी 60 असते मग त्यानंतर त्यांना पायउतार व्हावैच लागते .चांगले असतात तर लोक हळहळतात व कायम आठवण काढतात पण त्रास देणारे असतील तर लोकं निश्वास टाकतात व अशा लोकांच्या कचाट्यातून सुटका होते . पण समजतं कळतं की 100 वर्षानंतर किंवा त्याआधीच आपल्याला जावे लागेल तसेच 58 किंवा 60 नंतर निवृत्त व्हावे लागेल तरीही न कळण्यासारखे करत असतात .बघा पटतं का
प्रा.दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment