लाजायचं तरी कशाला
छान काम करायला
लाजायचं तरी कशाला
वाईट काम करताना
लाज वाटावी मनाला
चांगलं बोलायच असते
तेव्हा लाजायच तरी कशाला
वाईट शब्द तोंडातून काढताना
लाज वाटावी आपल्याला
गरजूंची सेवा करण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
वाईट व्यसन करताना
लाज वाटावी स्वत:ला
छान छान खाण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
तंबाखू बिडी सिगारेट ओढताना
लाज वाटावी स्वत:च्या आत्म्याला
अंगभर कपडे घालण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
देहप्रदर्शन जगाला दाखवण्यासाठी
लाज वाटावी आपल्याला
मित्रांचे स्वागत करण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
शत्रूंशी जवळीक साधतांना
थोडी लाज वाटावी मनाला
लग्न समारंभात नाचण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
दारू पिऊन नाच करण्यासाठी
लाज वाटावी मात्र स्वत:ला
पंगतीत जेवण करण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
बिअस बार मध्ये पार्टी करताना
हवी लाज स्वत:ला
नेहमी खरे बोलण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
कायमच खोटं बोलताना
लाज वाटावी आपल्याला
खळखळून हसण्यासाठी
लाजायचं तरी कशाला
कायम गंभीर चेहरा ठेवतांना
लाज वाटावी स्वत:ला
लग्न झाले नाही म्हणून
लाजायचं तरी कशाला
बर्याच गोष्टी करायच्या असतात
त्यावरून अर्थ मिळतो जगायला
जन्माला आलो आपण
म्हणून लाजायचं तरी कशाला
मृत्यू जवळ आला
तरी घाबरायचं कशाला
मुले झाली नाहीत म्हणून
लाजायचं तरी कशाला
अनाथ बालके आहेत भरपूर
त्यांना प्रेरणा द्या जगायला
जे चांगले करायचे राहून गेले
त्याला उशीर कशाला
ज्याला काहीच अर्थ नाही
लावू नये आयुष्य त्यात पणाला
केस पांढरे झाले म्हणून
लाजायचं तरी कशाला
मनाने कायम तरूण राहा
हे पटवून द्या स्वत:ला
खूप आयुष्य बाकी आहे
असा भ्रम कशाला
होते नव्हत्याचे होते क्षणात
हे पाहिजे कायम लक्षात ठेवायला
प्रा दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment