Skip to main content

दुरून डोंचर साजिरे

दुरून डोंगर साजिरे
डोंगर दूरून किती छान दिसतात दगड माती काहीही दिसत नाही एकदम चिकनेचोपडे दिसतात जरा जवळ गेले की त्यावर कुणीतरी हिरवी चादर पांघरली आहे असे वाटते आणखी एकदम जवळ गेले की मग अपेक्षाभंग होतो कारण दिसायला लागते दगड माती खासखळगे दरी घाण .गुळगुळीतपणा तर नावाला नसतो उगीच वाटले कशाला आलो आपण तसेच माणसांच्या बाबतीत होते एखादी व्यक्ती अपल्यापासून लांब राहिली जास्त परिचय नसला तर किती श्रेष्ठ वाटते आदर वाटतो पण जर का त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा योग आला तर मग त्याच्यातले दोष दिसू लागतात त्याच्या वाईट सवयी कळतात व त्याचे खरे रुप कळायला लागते आणि मग त्याच्याबद्दलचा  आदर फार नाहीसा होतो मग म्हणतो दूरून डोंगर साजिरे.काही नवरा बायकोचे भांडणे का होतात तसेच विभक्त का होतात त्याला हेच कारण .जोपर्यंच जास्त परिचय नव्हता तोपर्यंत आदर होता एकमेकांबद्दल पण जसे जवळ आले तसे एकमेकांचे गुणअवगूण कळायला लागले आणि त्या अवगुणांचा त्रास व्हायला लागला मग तो त्रास वाढतच जातो काहींना सहन न होऊन मग एकमेकांपासून लांब जातात शेवटी काय दूरून डोंगर साजिरे.शेवटी जवळिकच माणसाला दुसर्‍याचे खरे रूप दाखवते .जवळिक नसली की वर्षा वर्ष निघून जातात पण तो माणूस कळत नाही .नवर्‍याला व बायकोलाच फक्त माहित असते एकमेकांविषयी जास्त कारण ते कितीतरी वर्ष जवळ एकत्र राहतात.म्हणून एखाद्याचे खरे रुप बघायचे असेल तर त्याला जवळ करा म्हणजे कळेल.काही वेळेला एखादी व्यक्ती घमेंडखोर वाटते दूरुन पण जवळ गेल्याने वाटते की किती प्रेमळ आहे उलट काही व्यक्ती अशा प्रेमळ बोलतात की असे वाटते यांच्याशिवाय कुणीच प्रेमळ नम्र असू शकत नाही पण जवळीक झाल्याने वाटते की  यांच्याशिवाय कपटी कुणीच असू शकत नाही त्यामुळे  दूरून बघणे व जवळून अनुभवणे यात जमीन आसमानचा फरक आहे .जवळ गेल्याने आपल्याला खरे कळते व आपण सावध होतो .तुम्हाला  असे अनूभव आले असतील तसेच माणूस स्वत:लाही ओळखू शकत नाही कारण काही प्रसंग असे येतात की माणूस त्यावेळी विचित्र वागतो व नंतर पश्चातापाने होरपळतो व विचार करतो मी असा कसा वागलो? म्हणून स्वत:ला ओळखायचे असेल तर स्वत:च्या जवळ जायला पाहिजे तुकाराम महाराजांनी जेव्हा स्वत:ला ओळखले तेव्हा ते म्हणाले देव पाहावयासी गेलो तो देवच होऊन ठेलो  त्यामुळे लांब राहून कुणाचे ऐकून त्या व्यक्तींबद्दल निष्कर्ष काढणे हे चुकीचे आहे त्याच्याजवळ गेल्याशिवाय त्याचे खरे रूप कळणे अशक्य काळीवेळा जवळ जाऊनही ती व्यक्ती कशी हे कळत नाही तेव्हा त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आपल्याकडे तशी कला अवगत हवी  म्हणून दुसर्‍याला व स्वत:ला ओळखायला जमतं का बघा?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...