गुरुपौर्णिमा
गुरु हा देव गुरु हा ब्रम्हां
गुरु हा ईश्वर गुरु लाभावा आम्हां
गुरु हे तत्व गुरु हेच वचन
गुरु हे नाम गुरुचे वाचावे मन
गुरु हे जीवन गुरु हे जगणे
गुरु हा आशिर्वाद गुरुकडे काय मागणे
गुरु हा प्रकाश गुरु हे आकाश
गुरु हे दर्शन द्यावे आम्हा सावकाश
गुरु हा पाऊस गुरु हे हिरवे रान
गुरु ही नदी करावे गुरुला समर्पण
गुरु ही आई गुरु हे वडिल
गुरु हा बंधू गुरु सर्व देईल
गुरु हा शिक्षक गुरु हा निराकार
गुरु हा ग्रंथालय देतो जीवनाला आकार
गुरु ही पुजा गुरु हे वंदन
गुरु हे विश्व करतो आनंदी जीवन
गुरु हा आत्मा गुरु हे शरीर
गुरु हा मित्र देतो तो आधार
गुरु हा मोक्ष गुरु ही शांती
गुरु ही दया मिटवतो आपली भ्रांती
गुरु हे चिंतन गुरु हे मनन
गुरु हा विचार करतो तृप्त मन
गुरु हा सागर गुरु ही नौका
गुरु हा तारक देत असतो मौका
गुरु हा शुध्द गुरु हे पुण्य
गुरु हा शब्द करावे वचन मान्य
गुरु हे संत गुरु हा हरिपाठ
गुरु हा अभ्यांस म्हणावे गुरुला विद्यापीठ
प्रा. दगाजी देवरे
Very Good
ReplyDelete