लपलेला यमराज
बसला आहे लपून यमराज
कधी झडप घालेल सांगता येत नाही
ठेवतो तो बेसावध लोकांना
माणसाच्या हातात आहे तरी काही
कधी असतो रस्त्यावर तर
कधी असतो महालात
कधी असतो गाडीमध्ये
तर कधी असतो लपलेला घरात
हसते खेळते घर आपुले
करून टाकतो दु:खाचे आगार
तो आहे वटहूकूमाचा धनी
म्हणून नाही करत कोणता विचार
वय आणि पद नाही बघत तो
उचलायचे एवढेच ठेवतो मनी
वशिलेबाजीला नाही तेथे जागा
माणसाला मागू देत नाही पाणी
प्रत्येकाच्या जीवनात हमखास
तो एकदिवशी येतोच
आजपर्यंत नाही सुटले कुणी
गरीब श्रीमंत त्याच्यादृष्टीने सारखाच
कधी बनतो क्रूर तर कधी शांत
त्याचे गणित नाही कळले कुणाला
विज्ञानाने मारली बरीच झेप
पण तो ही त्याला घाबरला
तो नाही दिसत पण आहे ते सत्य
माणूस होतो मात्र त्यापुढे हतबल
आल्यावर मारतो वाघासारखी झेप
अन् बंद करून टाकतो सारी हालचाल
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment