Skip to main content

सुख

सुख व ज्ञान
सुखाच्या व्याख्या तर अनेकांनी वेगवेगळ्या केलेल्या आहेत .कुणाला वाटते भरपूर पैसा असला की सुख कुणाच्या मते घरदार गाडी बंगला नोकर चाकर म्हणजे सुख.काहींच्या मते दोन वेळचे खाणे राहायला घर आणि अंगभर कपडे म्हणजे सुख.काहींच्या मते पोरांनी भरलेले घर म्हणजे सुख काहींना वाटते मुले नोकरीला लागलीत त्यांची लग्ने झालीत त्यांना पोरं झालीत म्हणजे सुख .काहींना वाटते निरोगी जीवन म्हणजे सुख.कुणाला वाटते कुटूबांत प्रेमाचा ओलावा म्हणजे सुख. काहींना वाटते एकटे राहण्यात सुख तर काहींना मित्र मंडळी नातेवाईकात असणे म्हणजे सुख .काहींना वाटते घरात शांती म्हणजे सुख .काहिंच्या मते दुसर्‍याला मदत करणे म्हणजे सुख तर काहींना वाटते दुसर्‍याला त्रास देणे म्हणजे सुख अशाप्रकारे अनेक जणाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत तर आता संताच्या व्याख्या काय आहेत सुखाच्या ते पाहू संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात  रूप पाहता लोचनी सुख जाहले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तसेच सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई देवी वर आणि ते म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सारा हा संसार वाया येरझार हरिवीण. संत तुकाराम महाराज म्हणतात सुखासाठी जरी करीशी तळमळ एकवेळ जाय पंढरीशी.एकनाथ महाराज म्हणतात ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित.संताच्या दृष्टीने सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते तर ते आपल्या आत असते एखादा खूप श्रीमंत असूनही त्याला शांत झोप येत नाही पण एखादा गरीब माणूस शांत मनाने असा झोपतो की त्याला सकाळपर्यंत जाग येत नाही.आत सुख हे दडलेलेअसते तर ते बाहेर काढले पाहिजे त्यासाठी संत बाहेर शोधता शोधता  आत शोधतात व एकदा मिळाले की मग हे जग सुखाने भरलेले त्यांना दिसू लागते व कोणत्याही परिस्थितीत असे लोक दु:खी होत नाहीत कारण सुख त्यांना आत सापडलेले असते त्यामुळे बाहेरची कोणतीही परिस्थिती त्यांना विचलित करू शकत नाही.सामान्य माणसाच्या सुखाच्या व्याख्या दररोज बदलतात पण संताच्या व्याख्या कधीच बदलत नाहीत. ते आपल्या मस्तित असतात व ते सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे असते  असे त्यांनी लिहून ठेवले आहे. आपण सुख मिळवण्यासाठी जास्तीत जास्त काय करणार चांगले शिक्षण घेणार मोठी नोकरी मिळवणार त्याच्यापुढे आमदार खासदार बनणार मग मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान बनणार यापलीकडे काहीच मजल मारणे उरत नाही पण सुखाचा खजिना तर आत दडलेला आहे तो उघडण्याची गुरूकिल्ली एकदा मिळाली तर मग कोणतेही पद थिटे पडते .गजानन महाराज साई बाबा  तसेच अनेक संत होऊन गेलेत त्यांच्याजवळ कोणत्या पदव्या होत्या व कोणते पद होते .संत ज्ञानेश्वर महाराजांकडे कोणती पदवी होती की ज्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली  संत तुकोबांकडे कोणते शिक्षण होते की ज्यांनी हजारो अभंग लिहिले रामदास स्वामी यांच्याकडे कोणती पदवी होती की ज्यांनी मनाचे श्लोक सारखे भरपूर अभंग लिहिले  कारण आतील  सुख व ज्ञानाचा खजिना गुरूच्या कृपेने त्यांना सापडला व अजरामर झालेत व तो खजिना समाजात देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात .बघूया आपण त्यांना समजण्याचा प्रयत्न करू या
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...