परिक्षा
आल्या आल्या परिक्षा
घेऊ नका कोणते टेंशन
करा पूर्व तयारी परिक्षेची
होईल कमी तुमचे दडपण
पेन पेन्सिल पॅड हाॅल तिकिट
नका विसरू घ्यायला
नाहीतर होईल पळापळ
अन् येईल टेंशन पेपर लिहायला
असते शेवटची रिविजन
फार महत्वाची
पेपर लिहितांना आठवतात
उत्तर सर्व टाॅपिकची
जरी अवघड गेला पेपर
तरी घाबरून नका जाऊ
परिणाम होतो पुढच्या पेपरवर
म्हणून मन शांत ठेऊ
परिक्षा असते जीवनातली
स्वप्न पूर्ण करण्याचे माध्यम
परिक्षा नसते अंतिम जीवन
शेवटी जीवन महत्वाचे यावर रहा ठाम
अनेक वेळा नापास होणारे
आहेत मोठमोठ्या पदांवर
अपयश असते यशाची पायरी
म्हणून दडपण नका घेऊ मनावर
मिळवा आपल्या मेहनतीवर
चांगले मार्कस
काॅपी वगैरे करून नका मिळवू
फुकटचे मार्कस
देवाला नवस करून
नाही मिळत चांगले यश
स्वत;च्या मेहनतीवर ठेवा भरवसा
नाही येणार कधी अपयश
पेपरला जातांना घ्या
थोरामोठ्यांचे आशिर्वाद
त्याने होईल मन शांत
पेपर लिहितांना वाटेल आनंद
खाण्यापिण्याची घ्या काळजी
नका पडू आजारी
मन शांत ठेवून करा प्रवास
वेळेवर पोहचा आपल्या केंद्रावरी
देतो तुम्हांला परिक्षेच्या
उत्तम उत्तम शुभेच्छा
मिळू दे तुम्हांला यश
अशी करतो मनापासून इच्छा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment