कसा आहेस रे तू देवा
कुणी म्हणतो निराकार
कुणी म्हणतो आहे आकार
वाटतो काहींना तुझा आधार
काही म्हणतात आम्ही निराधार
पण नक्की कसा आहेस तू
काही म्हणतात आहे तू वैकुंठी
काहींना वाटते आहे तू देठी
काही म्हणतात तू मारतो मिठी
म्हणतात तुला काही जगजेठी
पण नक्की कसा आहेस तू
काही म्हणतात आहे तू मंदिरात
काहींना वाटते तू आहे मशिदीत
काही चर्चमध्ये तुला शोधतात
काही तिर्थस्थानी भटकतात
पण नक्की आहेस तू कुठे
काही म्हणतात तुझे नाव राम
काहींना वाटते तू आहे रहीम
काही बोलतात घ्या अल्लाचे नाम
काही बोलतात येशू खरे नाम
पण सांग ना तुझे खरे नाव
काहींना वाटते तू आहे चालक
काहींना वाटते तू आहे मारक
काही म्हणतात तूच आहे कारक
काही बोलतात तू आहे तारक
पण सांग ना तू आहे नक्की काय
काही म्हणतात तू देतो सुख
काही बोलतात तू देतो दु:ख
काही बोलतात तू करतो राख
काही म्हणतात तू सांगतो वाक
पण सांग ना तू नक्की काय देतो
काही म्हणतात तू घेतो अवतार
काही म्हणतात तू आहे खूप दूर
काही बोलतात तू आहे अंदर
काहींना वाटते सर्व आहे खरं
पण सांग ना तू नक्की आहे काय
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment