बैलांच्या आठवणी
आज बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आमच्याकडेही बैल होते गायी होत्या बकर्या होत्या म्हशी होत्या .त्यांना वेळोवेळी चारापाणी देणे त्यांची स्वच्छता करणे .बर्याच वेळा डोंगरावर जाऊन त्यांना चारण्यासाठी घेऊन जायचो त्यामुळे हे प्राणी घरच्या सर्व माणसांना ओळखतात व घरातील माणसांना बघून हेच प्राणी हंबरडा फोडतात व आपले प्रेम दाखवतात .जे आजकाल मुलांना आईवडिलांकडे बघूनही काहीच प्रेम वाटत नाही पण प्राण्यांना वाटते .आम्ही शेतात नांगरणी वखरणी पेरणी करायचो बिचारे बैल मुकाट्याने काम करायचे कधीही त्यांनी बंड केले नाही .कधी तक्रार नाही असा चारा दिला व तसा चारा दिला हे इमानदार पणाने कामं करतात पण एक दिवस आमचा बैल अचानक मेला तेव्हा घरातील सर्वजण फार दु:खी झाले कारण बैल म्हणजे एक कुटूंबाचा सदस्य होता त्यातून सावरायला बराच काळ गेला काही लोक बैल म्हातारे झाल्यावर काठीने मारतात तसेच काठीला खिळा ठोकतात व टोचतात मग बिचारे भीतीपोटी पळतात रक्त निघते हे मी आजूबाजूला बघितले आहे .आम्ही बैलगाडीवर मामाच्या गावी जायचो तसेच शेतीचा माल विकण्यासाठी बैलगाडीने तालूक्याच्या ठिकाणी म्हणजे सटाण्याला जायचो तेव्हा फार मजा वाटायची .पोळ्याच्या दिवशी त्यांची आंघोळ घालायची त्यांना विविध रंगाने सजवायचे शिंगाना रंग द्यायचे पुरणपोळी खाऊ घालायचे त्या दिवशी त्यांना काहीच काम करायला द्यायचे नाही गावात मिरवणूक काढायची तेव्हा फार आनंद वाटायचा त्या दिवशी त्यानी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची बैलांच्या सेवेमुळेच शेतीचे काम चांगले व्हायचे व शेतीत पिके डोलायची व त्यातून पैसा यायचा व त्यातूनच आमचे शिक्षण झाले म्हणून आज जो काही पैसा मिळतो व नोकरीला आहे त्यात बैलांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे कर्ज मी कधीही फेडू शकणार नाही .अजूनही ते बैल आठवतात व त्यांच्या बरोबर घालवलेला काळ आठवतो व त्या आठवणी आजही आनंद देतात .जेथे असतील ते आनंदी सुखी राहू दे मग कोणत्याही जन्मात असतील तरीही एवढी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment