Skip to main content

पाऊल पहिले

पहिले पाऊल
आपल्या जीवनात अशा अनेक घटना घडतात की त्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो कारण पहिले आपण पाऊल उचलले नसते व वेळ निघून गेलेली असते. लग्नाच्या वयात कुणीतरी मनापासून आपल्याला आवडत असते पण तसे सांगण्यासाठी आपण पाऊल उचलत नाही व ते न उचलल्यामुळे वेळ निघून जाते व ती व्यक्ती एवढ्या लांब जाते की दिसेनासी होते मग नंतर पश्चाताप येतो व वाटू लागते की मी पहिले पाऊल का उचलले नाही तसेच आपण चांगले मित्र असतो पण गैरसमजातुन आपण लांब जातो व त्याने पहिले बोलले पाहिजे मी का बोलू या विचाराने तो मित्र खूप लांब जातो व पहिले पहिले न करण्याची शिक्षा आपण भोगत असतो तसेच नात्यामध्ये काहीवेळा संबंध खराब होतात तेव्हा त्याने पहिले साॅरी मागायला पाहिजे मी का मागू या विचाराने त्या संबंधाची दरी वाढत जाते.काहीवेळा आपल्याला नोकरीची पहिली संधी चालून आलेली असते पण त्या पहिल्या संधीकडे आपण कानाडोळा करतो व नंतर आयुष्यात आलेली पहिली संधी गमावली ही खंत आयुष्यभर बोचत राहते अनेक घरात पती पत्नीमध्ये मौन चालु होते काहीतरी गोष्टींमुळे मग तिला वाटते त्याने पहिले बोलायला पाहिजे त्याला वाटते तिने बोलायला पाहिजे असे करता करता अनेक दिवस महिने निघून जातात व त्याचबरोबर आनंदाचे क्षणही दुरावतात म्हणून पहिले पाऊल समोरचा माणूस बघून जरुर आपणच उचलले पाहिजे जेणेकरून आपण उचलले याचे समाधान आपल्याला  मिळत राहील व त्याचबरोबर समोरचा आपला गैरफायदा घेणार नाही याचेही भान असायला हवे .काहीवेळा आपणच पहिले पाऊल उचलतो त्यामुळे समोरच्याला वाटते की कुठे जाणार येईलच आपल्याकडे असेही होता कामा नये म्हणून पहिले पाऊल उचलतांना फार विचारपूर्वक उचलले पाहिजे. काहीवेळा पहिले पाऊल उचलल्याने आपण संकटात सापडू शकतो मनस्ताप होऊ शकतो.बघा विचार करा व जसे जमेल तसे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...