पिकनिक
पिकनिक म्हणजे नसते
फक्त गाठीभेटी
मिळते त्यातून नवीन उर्जा
पुढच्या जीवनासाठी
पिकनिकमुळे होतात आठवणी ताज्या
होतो माणूस लहानाहूनी लहान
गळतो त्याचा अहंकार आणि गर्व
परमानंदी झेप घेते मात्र मन
पिकनिकमुळे होते मन हलके
मारून गप्पा मित्रमैत्रिंणींशी
त्याची आहे आज गरज
एरवी माणूस बोलतो तरी कुणाशी
पिकनिकमुळे विसरायला होते
आपले पद व आपण कोण
उरतो फक्त आनंद
भरून पावते मित्रांना भेटून मन
पिकनिकमुळे मिळतो बदललेला
चेहरा बघायला
पण आतील मन असते तेच
ते मिळते पिकनिकमुळे वाचायला
पिकनिकमुळे मिळतो शरीराला
नवीन ताजा आॅक्सिजन
तो मिळत नाही बाजारात
कितीही किंमत मोजून
पिकनिक म्हणजे नसते
माणसांची फक्त गर्दी
जीवनात आनंद येणार
हे देणारी असते ती वर्दी
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment