दुष्काळ संताचा
असे म्हणतात की आपल्या देशात अनेक संत होऊन गेलेत व त्यांनी आपली अभंगवाणी , ग्रंथ निर्माण केलेत व जवळजवळ सातशे तीनशे वर्षापूर्वी त्यांनी असे काम केले व त्यांचे साहित्य पाहिले की अचंबित व्हायला होते . संसार करता करता परमात्म्याचे सार त्याच्या पर्यंत पोहचण्याचा मार्ग त्यांनी सांगितला. आजही त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवन जगतांना उपयोगी पडते व त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी कमीच आहे पण मला वाटते त्यांच्यानंतर असे किती संत निर्माण झालेत की समाजाचा त्यांच्यावर भरवसा आहे व ते त्या विश्वासाला पात्र ठरले .घरोघरी ते पूर्वीचे संत सोडले तर असे किती संत आहेत की त्यांच्याकडून आपण चमत्चार पाहिला असेल फक्त बोटावर मोजण्याइतकेच .संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या उंचीएवढा संत अजूनही समाजात दिसत नाही असे का होते विज्ञानाने एवढी प्रगती केली पण मग असे संत आपल्याला समाजात का दिसत नाही की ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण मानवजातीवर उमटवला भोंदू बाबांचे पिक जास्त दिसते त्यामुळे खरे संत जरी असतील तरी सामान्य जनता विश्वास ठेवत नाही .जनतेच्या मनात संशय निर्माण होतो म्हणून जे पूर्वीचे संत होऊन गेलेत उदा. संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराज तुकाराम महाराज रामदास स्वामी संत कबिर मिराबाई संत रोईदास सावता माळी संत तुळशिदास गोरा कुंभार नरहरी सोनार संत निवृतिनाथ सोपान मुक्ताई विठ्ठलपंत अशा संताची नावं व त्यांचे कार्य अजरामर झालीत व आजही त्यांचा गौरव होतांना दिसतो पण त्यांच्यानंतर कुणाचा एवढा गौरव दिसत नाही .आज त्यांच्याव्यतिरिक्त समाजासमोर कुणाचा आदर्श आहे?तरूणाई तर कलाकारांचे खेळाडूंचे आदर्श ठेवतात पण त्यांच्याकडून काही वाईट कृत्य झाले की लगेच तेच आदर्श पायदळी तुडवतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे नश्वर आहे ते स्थिर आहे व जे स्थिर आहे ते नश्वर आहे असा जो चुकीचा संदेश सगळीकडे दिला जातो त्यामुळे आजच्या तरूणाईला पटवून देण्यात विज्ञान कमी पडते की काय असे वाटू लागते .बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment