खटाटोप
माणूस जन्माला येतो मग काही गरीब घरामध्ये जन्माला येतात की जेथे दोन वेळेचे अन्न नसते राहायला घर नसते अंगावर कपडेही पुरेसे नसतात व काही श्रीमंताघरी जन्माला येतात सगळे सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेतात पण दोघांनाही मृत्यू ठरलेला असतो मग काहीजण म्हणतात त्याने पूर्वी पुण्य केले असले पाहिजे म्हणून श्रीमंताकडे जन्माला आला व काहींनी पाप केले असणार म्हणून गरीब घरात जन्म घेतला असेलपण मी म्हणतो हा जन्म घेण्याचा मरण्याचा खटाटोप त्या नियतीने कशाला रचला असेल शेवटी सगळ्या गोष्टींचा जर अंत ठरलेला आहे मग हे धावपळीचे जीवन मग कशाला किंवा जीवनाचे प्रयोजनच कशाला .गरीबीतून माणूस शिकतो मोठा होतो पैसे कमवतो व थोडे सुखाचे घास खाऊ लागतो मग क्षुल्लक गोष्ट घडते व त्याचा मृत्यू होतो मग हे जे केले त्याने कष्ट त्याला काहीच अर्थ उरत नाही .जर जे आहे ते संपणारच असेल तर मग कशाला निर्माण केले असेल .निर्माण करायचे व त्याचा अंत करायचा व स्वत: नियती मात्र अमर चिरंजीव निराकार कधीच अंत न होणारी कुणाचाच तिच्यावर दबाव नाही ती स्वत:श्रेष्ठ पण या जगतातील सगळे तिचे बाहूले जशी ती नाचवते तसे आपण नाचतो कधी काय होईल ते नियती शिवाय कुणालाच माहीत नसते . नेतांना मात्र गरीब श्रीमंत तरूण बालक म्हातारा असे काहीच बघत नाही.मग हा खटाटोप मांडला तरी कशाला.काय प्रयोजन असेल. एवढे विश्व निर्माण केले व शेवटी त्याचाच अंत करायचा मग निर्माण तरी कशाला केले .जीवनाच्या चक्रामध्ये कशाला अडकवले .किती पिढ्या गेल्या व किती माणसे गेली याचा हिशोब ठेवणे मुश्किल आहे .हे चक्र का असेल ?जग रहाटी तरी कशाला निर्माण केली .एखादे घर खोटे बांधावे वआईने हाक मारली की लगेच ते मोडून निघून जावे तसेचआहे हे जीवनाचे गणित का बरे असा खेळ मांडला असेल जर संपवायचा असतो हा खेळ मग सुरू तरी कशाला करायला हवा .ह्रा खेळामध्ये सर्व प्राणी झाडे यांना अडकवून गंमत बघायचे काम नियती करत असते व या खेळाला खरं मानून माणूस हा खेळ खेळत असतो व एक दिवशी कळतं की हा खेळ म्हणजे भ्रम आहे व भ्रमाचा भोपळा फुटतो पण वेळ निघून गेलेली असते. कर्मामध्ये अडकून सर्व लोक सारखी धावपळ करतात पण एक दिवशी हा खेळ किंवा धावपळ थांबते संपते विचार करण्यासारखी गोष्ट आहे व त्याचे उत्तर कुणाकडेही नसणार .प्रश्न सोपा वाटतो पण उत्तर देणे अवघड
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment