Skip to main content

राव मॅडम

🌹🌹मन आहे रे प्रसन्न (राव मॅडम )🌹🌹

मॅडम पुढच्या वाटचालीला
देतो मनापासून शुभेच्छा
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
अशी करतो देवाकडे इच्छा 1

तुमच्या मुखातून शब्द पडताच
वाटते मधातून आल्यासारखे बुडून
लागतात  कानाला  गोड
सुखाहून  जाते समोरच्याचे मन 2

आम्ही सर्वजण आहोत खूश
तुमच्या कामाच्या पद्धतीवर
म्हणून वाटते होऊ नये
तुम्ही  कधीच रिटायर 3

बरेच वर्ष केला तुम्ही
वसईहून  खडतर प्रवास
पण कधीच केला नाही बाऊ
मग कितीही झाला असेल  तुम्हांला त्रास 4

सर्वांशी बोलताना किती
आतबीने तुम्ही बोलता
त्याची कुणीच नाही करणार बरोबरी
प्रत्येक गोष्ट  छान पटवून सांगता 5

राग आहे तुम्हांला
असे तुम्हीच म्हणता
काढला असेल तो कधीतरी बाहेर
पण समोरच्याला न दुखावता 6

तुमच्या मैत्रिणी आहेत
तुमची ताकद खरी
त्या ताकदीमुळेच राहिली
कायम तुमची तब्बेत बरी 7

तुमची साधी राहणी
आणि आहेत छान विचार
मधुर शब्द अन् आपले काम
नेहमीच असते तुमच्या बरोबर 8

तुमचे लयबध्द बोलणे
हे जमतं फक्त तुम्हांला
कसं जमत असे बोलणे
हा प्रश्न पडतो आम्हांला 9

उद्यापासून तुम्हांला दुरावतील
तुमच्या  जीवलग मैत्रिणी
होता आहेत एकामागून एक रिटायर
हे थांबवणार नाही मात्र कुणी 10

फार वाईट वाटते मला
आज खरंच मनापासून
एक सुंदर पक्षी उडून चालला आहे
रुपारेल काॅलेजच्या घरट्यातून 11

वाट बघता आहेत पुढच्या प्रवासासाठी तुमची
राणे मॅडम आणि सावंत मॅडम
त्यांना सांगा जरा थांबायला
लवकरच येत आहे ठिपसे मॅडम आणि वझे मॅडम 12

तुमचे रोखठोक बोलणे
माझ्या मनाला फार भावले
मनात किंतू ठेवण्यापेक्षा
असे बोलणे कधीही असते चांगले
   13

काॅलेजमध्ये किती तास झालेत
याचा कधीच मांडला नाही हिशोब
कामाला महत्व देऊन
नाही केली पुढे कोणती सबब 14

तुमचे विद्यार्थीही  घेतील
तुमचे कायम नाव
तुमच्याकडे बघून  आज वाटते
सार्थक झाले तुमचे नाव राव 15

प्रत्येकाला आठवत राहील
तुमचा कायम हसरा चेहरा
कधीच दिसली नाही चिंता
कारण असायचा मैत्रिणींचा आसरा 16

तुम्ही मैत्रीणीं शिवाय कसे राहणार
याचे करतो मी  सध्या चिंतन
कारण त्या नुसत्या  तुमच्या मैत्रिणी नाहीत
आहेत त्या तुमच्या आॅक्सिजन 17

तुमच्याकडे बघून आज वाटते
माणसाला हवेत विश्वासातले मित्र
वर्ष निघून जातात भराभर
सुख दु:खात असतात ते मात्र 18

काॅलेजच्या कामाला देतात
स्वत:ला तुम्ही झोकून
तब्बेतीची करत नाही तमा
देतात कामाला पूर्ण समर्पण 19

वय वाढल्याचे एकही लक्षण
दिसत नाही  तुमच्या चेहर्‍यावर
आहे काय गुपित ते
कधी  आम्हांला  तुम्ही सांगणार 20

मॅडम तुम्हांला सांगायची
राहूनच गेली एक गोष्ट
कामाच्या गडबडीत नाही झाली
ती सांगण्यासाठी तुमची भेट 21

परिक्षेची जबाबदारी फार
छान प्रकारे तुम्ही सांभाळली
त्या धावपळीत केसांची निगा
घ्यायची तेवढी राहीली 22

बसतांना तुम्ही होता
उपप्रार्चायांचा डावा हात
पण काम करताना बनलात तुम्ही
त्यांचा मात्र उजवा हात 23

कोणतेही काम करताना
एक गोष्ट तुमच्याकडून शिकावी
कुरकूर न करता कपाळावर
आठी कधीच न दिसावी 24

तुमच्या  ग्रूपचा मैत्रीचा आदर्श
सगळ्यांनी ठेवावा जपून मनात
झाले असतील तुमच्यातही वादविवाद
पण एकमेकांपासून कधीच
दूर नाही गेलात25

अनेक लोकांच्या  चुका
तुम्ही सांभाळून घेतल्या
प्रेमाने सांगून त्या जागीच
दुरूस्त करून घेतल्या 26

कुणाचे विरोधी बोलणे वागणे
तुम्हांला नाही सहन होत
आत अन्याय दडवणे
हे नाही तुमच्या स्वभावात 27

तुमच्या निवृतीने तुमच्या
ग्रुपमध्येही  होईल मोठी पोकळी
निदान डबा व चहा घेताना तरी वाटेल त्यांना
  तुम्ही असावे  जवळी 28

मराठी विभागावर कधीच
बाॅसगिरी तुम्ही नाही दाखवली
सगळ्यांशी गोड बोलून
कामाची जबाबदारी निभावली 29

तुमचा मराठी विभाग
आहे एक समभूज त्रिकोण
तुम्ही नेहमीच ठेवला
एक सकारात्मक दृष्टिकोन 30

तुमच्या विभागातील लोक होते
तुमच्या छायेखाली  मजेत
आता येतील टेंशनमध्ये
कारण निघून चालले त्यांच्यावरील मायेचे छत 31

co ordinator cm परिक्षा कमिटी
अशी विविध पदे तुम्ही भुषवली
प्रत्येक पदाला न्याय देऊन
सगळ्यांची वाहवा तुम्ही मिळवली 32

पाळीव पशूपक्ष्यांची प्रचंड आहे
तुम्हांला आवड
त्यांच्या सेवेसाठी काढतात
व्यस्त कामातून सवड33

फुलांमधील फुल आहे
तुम्ही सुगंधी  मोगरा
सगळीकडे सुगंध दरवळतात
त्यामुळे सगळ्यांचा चेहरा होतो हसरा 34

येईल तुमच्या स्वप्नात
आज मॅडम सुजाता
घट्ट मिठी मारून तुम्हांला विचारणार
कसं राहू गं माधवी तुझ्याशिवाय आम्ही आता 35

मॅडम आता घरी वेळेत
शांत चित्ताने व्यवस्थित खात जा
जोगळेकर मॅडम ओरडण्यासाठी तुमच्याजवळ नसल्याने
स्वत:च्या खाण्याची काळजी स्वत: घेत जा36

जीवनभर प्रेम केले
तुम्ही  फक्त पाच गोष्टीवर
केली तुम्ही  मनापासून माया
सुरेश, मैत्रिणी,  दैनंदिन काम, गाणी आणि साडीवर 37

मराठी विषय  असूनही
नाही घाबरलात इंग्रजीला
राॅय शुक्ला सरांशी बिनधास्तपणे बोलून
केले सिध्द मात्र स्वत:ला 38

रूकमती ग्रूप व काॅलेजमधून तुमचे जाणे
होईल  क्लेशदायक आम्हांला
मनातून तुमचे स्धान कधीच जाणार नाही
ही शाश्वती देतो आम्ही तुम्हांला39

निवृतीने मिळेल तुम्हांला
उत्साही राहण्याचे बळ
राहिलेले छंद जोपासण्यासाठी
भरपूर मिळेल तुम्हांला वेळ 40

निवृती नंतर सुरेशरावांचा जप
नक्कीच तुमचा कमी होईल
अन् सुरू होईल तुमचा जप
सुजाता पप्पू  अनू आणि मृणाल 41

निवृतीच्या वाटेवर भेटावीत
फुले सुखाची  तुम्हांला
आयुष्य निरोगी मिळो
अशी प्रार्थना करतो देवाला 42

प्रा. दगाजी देवरे
7738601925
29/6/2019

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...