संरक्षण कवच
प्रत्येक माणसाभोवती एक संरक्षण कवच असते पण माणसाला त्याची जाणीव नसते किंवा त्याबद्दल माणूस अज्ञानी असतो व त्या संरक्षण कवचामुळे आपले नुकसान होण्याचे टळते .ते संरक्षण कवच म्हणजे चांगल्या विचारांचे ,सगळ्यांचे चांगले व्हावे मग शत्रू असो की मित्र असो सगळ्यांविषयी चांगल्या भावना ठेवून त्यांचे कल्याण व्हावे ही इच्छा.कुणाचेच वाईट चिंतन नसावे . संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यपाहो जो जे वांशिल तो ते लावो प्राणिजात .अशा चांगल्या चिंतनाने चांगल्या विचारांचे कवच आपल्या भोवती तयार होते जसे झाड तोडणारा व झाडाला पाणी देणारा असो झाड सगळ्यांना समान सावली देते फळे फुले देते कोणताही दुराभाव त्याच्याजवळ नसतो किंवा देवाचे भजन करणारे किंवा देवाला न मानणारे देव सगळ्यांना हवा पाणी सारखेच पुरवितो त्याचप्रमाणे शत्रूचेही कल्याण होवो व त्याच्याविषयी कोणतेही वाईट चिंतन करू नये तरच ते संरक्षण कवच आपल्या भोवती तयार होते आपले मन शांत बनते कोणतेही वाईट विचार नसल्याने ते विचलित होत नाही जसे स्थिर पाण्यात खडा टाकला की पाणी अस्थिर होते तसेच शांत मनात कुणाविषयी वाईट चिंतन केले की शांत मन विचलित होते व ते विचलित मन चांगले कार्य आपल्या हातून घडू देत नाही म्हणून वाईट विचाराने शत्रूचे नुकसान होण्याएवजी आपलेच नुकसान होते म्हणून आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतो .सतत शत्रूचे वाईट चिंतन करून स्वत:चे मन कलूषित करून घेतो व मनात सतत घाण भरत असतो त्यामुळे शरीराच्या व्याधी निर्माण होतात अनेक आजार डोकं वर काढतात कितीही पैसा असला तरी शांती वाटत नाही म्हणून सगळ्यांचे कल्याण व्हावे ही भावना ठेवली तर आपले प्रथम कल्याण होते व आपल्या भोवती संरक्षण असे तयार होते की कोणत्याही गोष्टीने आपले मन विचलित होत नाही .आपणच असतो आपल्या जीवनाचा शिल्पकार .बघा पटतं का? जे अनुभवले तेच सांगितले
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment