छान जोडी
डॅडी व नानीव यांचे नाते
आहे प्रेमाचे
नवरा बायकोचे नाते असूनही
जास्त दिसते मैत्रिचे
नानिनि उपास तापास करून
मिळवला जोडीदार आयुष्याचा
डॅडीही निभावतात नाते
आणि मान वाढवला नानींचा
डॅडी दिसतात नानिला
थोडे स्वभावाला कठोर
पण जसं कठीण दिसते नारळ
आणि आतला मऊ असतो गर
जे आवडले डॅडींना त्यासाठी
काहीही किंमत मोजायची असते त्यांची तयारी
पुढचा मागचा विचार न करता
मिळवण्याची रितच आहे त्यांची न्यारी
आपल्या मनासारखे नाही झाले
तर रोखठोक बोलून मोकळे होतात
दुसरा दुखावला जातो याचा विचार न करता
आपल्या मनासारखेच करतात
दोघेही जण ज्याच्या संपर्कात आले
त्यांच्याशी आपलेपणाने बोलतात
सहजच होऊन जाते मैत्री
राहून जातात कायमचं लक्षात जीवनात
आयूष्याच्या ह्या वळणावर आहे
एकमेकांना चांगली साथ
एकमेकांना सांभाळून करू नये
जीवनात कशाबद्दल वाद
डॅडीनी डोक्यावर ठेवावी
बर्फाचि अख्खी लादी
मिळेल स्वत:ला शांती
आणि होतील घरचे बाहेरचे आनंदी
तरूणाला लाजवेल असा उत्साह
आहे तुमच्या दोघात
भारवून जातात समोरचे लोकं
बघून तुमचे खळखळून हसण्यात
सिगारेटचे व्यसन कमी केले तर
आयूष्य वाढेल तुमचे
तुमची गरज आहे बर्याच जणांना
म्हणून सांगणे आहे आमचे
सोन्या सोन्या करुन
लावला आर्याला जिव्हाळा
ती कधीच विसरणार नाही
असे वाटते आम्हांला
डॅडी आहेत भावापेक्षा
वयाने मोठे
वय वाढल्याचे दिसत नाही
चेहर्यावर लक्षण कोठे
हाफ पॅंट व टी शर्टमध्ये
दिसतात तुम्ही छान
फोटो बघून ग्रुपचा
विचारतात ही व्यक्ती आहे कोण
नानी आहे स्वभावाने
फारच साधी भोळी
दुसर्याप्रती भावनिकता आहे
त्यांच्या फारच जवळी
नानिंच्याही मताचा तुम्ही
करावा नेहमी आदर
पुढच्या जन्मीहि हाच नवरा मिळावा
असे मागणे करतील देवापुढे सादर
तुम्हा दोघांचे आयुष्य पुढे
निरोगी समाधानी जावो
कुटूंबासाठी व समाजासाठी
तुमची मदत मिळत राहो
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment