मैत्री
जमला मित्रांचा आज गोतावळा
काय महिमा हा वर्णावा
शब्द पडतात थिटे
आहे क्षण हा आनंदाचा
येतात काॅलेजच्या आठवणी
आज उचंबळून आल्या भारी
कसं सांगू मी तुम्हांला
सांगतो मी तुम्हांला तरी
बदललेले चेहरे सगळ्यांचे
शरीरयष्टीही बदलून गेली
हेच ते मित्र आहेत का
अशी शंकेची पाल मनात चुकचुकली
मुलींशी बोलतांना खूपच
घाबरगुंडी माझी व्हायची
होतो मी लाजरा फार
आता सवय केली बदलायची
मोठमोठ्या पदांवर आपले
मित्र आहेत विराजमान
आज मी गर्वाने फुगलो
आणि वाटतो मला त्यांचा अभिमान
गेटटुगेदर करण्यात मैत्रीणींचा
वाटा आहे लाख मोलाचा
नोकरी घरदार सांभाळून
आज उपयोग केला त्यांनी वेळेचा
नवल वाटते मला एवढी वर्ष
निघून गेलीत कशी भराभर
काही झालेही आजी आजोबा
ऐकून विश्वास बसत नाही कानावर
या मित्रमैत्रीणी बरोबर परत
काॅलेजला जावंस वाटतं
राहिलेली मौजमजा करण्यासाठी
सटाणा काॅलेज गाठावसं वाटतं
शेतकरीही मित्र आहेत येथे
फुलविला त्यांनी आपला मळा
संत सावता माळींचा अभंग म्हणत
पिकवितात कांदा भाजी मुळा
कामात व्यस्त राहूनही
काढला सगळ्यांनी आज वेळ
मित्रांच्या निस्वार्थ प्रेमापोटी
जूळून आला आज हा मेळ
या ठिकाणाची निवड केली
नियोजकांनी फार छान
येथील नटलेल्या निसर्गामुळे
आनंदी झाले सगळ्यांचे मन
घेऊन जाऊ या छान छान
आज ताज्या आठवणी
पुरतील त्या वर्षभर आपल्याला
देऊन आनंद आपल्या मनी
माझ्या कविता सहन करतात
त्यामुळे आहे मी तुमचा आभारी
लिहित असतो विरंगुळा म्हणून
मिळते मला कामात उभारी
तुमचा आवाज फोनवर ऐकल्यावर
संचारते उर्जा माझ्या शरीरात
जगायला मिळतो हूरूप
त्यामुळे दिवस जातो माझा आनंदात
धर्मा असतो ग्रुपमध्ये
कायम सक्रीय जनी
छान छान मेसेज टाकून
आनंद देतो मनी
मुंडावरेचे कार्यक्रमाचे फोटो बघून
अभिमानाने भरून जाते माझी छाती
हा बघा माझा मित्र आहे
हे सांगत सुटतो मी जगी
साधा भोळा कापूरेही माझ्या
चांगलाच राहिला लक्षात
त्याला ओळखणे नाही गेले जड
कारण काही बदलच झाला नाही त्याच्यात
मी होतो अभ्यासाचा किडा म्हणून
मला दिसल्या नाही त्यावेळी या परी
तरी बोरसे सांगत होता मला
जास्त डोकं नको घालू अभ्यांसावरी
प्रमोदचे ठासून बोलणे
आजही स्पष्ट आठवत
त्याच्या बोलण्यात काहीच नाही बदल
हे आजही त्याच्याकडे बघून पटतं
अशोकचा गोरागोमटा चेहरा
आजही चांगलाच आठवतो
वहिनींच्या ब्युटी पार्लरमुळे
आजही तो स्मार्ट दिसतो
माझे जेव्हा वडिल गेले
तेव्हा दिनेशने दिला होता आधार मला
हे आजही मला चांगलच आठवतं
त्याबद्दल धन्यवाद आहेत तुला
बर्याच मित्रांचे चेहरे
मला आठवायला लागले
थोड्या वेळेसाठीही का होईना
मला भूतकाळात घेऊन गेले
पुरू हसरा चेहरा करून
आजही करतो कोटी
भेटतो आम्ही अधूनमधून
करतो सुखदु:खाच्या गोष्टी
मैत्रीणींना बघून वाटते
जशा स्वर्गाहून परी अवतरल्या
आज आपले भाग्य थोर
कार्यक्रमात त्या उत्साहाने सहभागी झाल्या
आजच्या सोहळ्यात विसरायला होते
आपले पद व आपण कोण
आपण फक्त मित्र आहोत
ह्या भावनेने होते आनंदी मन
काहीवेळा होतात ग्रुपमध्ये
काही विषयांवर वादविवाद
पण सगळे आहेत समंजस
म्हणून त्यातूनही मिळवतात आनंद
सगळे आपआपल्या क्षेत्रात
करतात प्रामाणिकपणे काम
उमटवला त्यांनी कामात ठसा
मिळवतात आपल्या कष्टांचा दाम
जे नाही आज आले
त्यांनी ग्रुपमधील फोटो बघूनच समाधान मानावे
एवढ्या मोठ्या आनंदाच्या सोहळ्याला
त्यांनी हजर राहायला हवे
सगळ्यांना सुखासमाधानात ठेव
अशी करतो परमेश्वराकडे प्रार्थना
असंच प्रेम राहू दे आमच्यामध्ये
अशी करतो त्याच्याकडे मनोकामना
प्रा. दगाजी देवरे
रूपारेल काॅलेज मुंबई
दि.28/07/2019
7738601925
Comments
Post a Comment