भेदभाव पावसाचा
जिथे बरसतो तिथे करतो
सगळीकडे पाणीच पाणी
पाठ फिरवतो काहींकडे
त्यांच्या डोळ्यात आणतो पाणी
धरणे फुटतात बंधारे वाहून जातात
सगळीकडे असतो पूरच पूर
काही ठिकाणी धरणे सुकली नद्या आटल्या
का रे जातो त्यांच्या पासून दूर
आता जरा थांब भरले घरात पाणी
झाले सगळे सामान ओलेचिंब
काही ठिकाणी घरात नाही पाणी
अश्रूंनी तुझी वाट पाहून डोळे भरले चिंब
का वागतोस सावत्रासारखा
बघतात तुझी कायम वाट
तुझीच आहेत लेकरे सारी
नको खेळू तू सारीपाट
दिसू दे शेत हिरवे हिरवेगार
होऊ दे चारा रानोमाळी
बरस तू सारखा सगळीकडे
भरू दे धरणे नद्या नाली
होऊ दे शेतकरी आनंदी
बघून शेतात पिके सारी
नको ठेवू कमरेवरती हात
बोलबाला चालला आहे वारी वारी
येऊ दे तुला दया कधीतरी
पाहून सगळ्यांचे हाल
का वागतोस असा तू
नको बनू कुणाचा तू काळ
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment