कुछ चीजे बाजार मे नही मिलती
काही गोष्टी अशा आहेत की बाजारात कितीही पैसे मोजले तरी ते विकत मिळत नाही .त्यातील पहिली गोष्ट म्हणजे भूक बर्याच जणांना भूकच लागत नाही थोडेसे खाल्ले तरी त्यांना अपचनाचा त्रास होतो मग भूक लागावी म्हणून अनेक औषधे घेतात पण नैसर्गिक भूक जी असते तिची गोष्टच वेगळी असते घरातील मालक एक चपाती खातो तर त्या घरात काम करणारी व्यक्ती सात आठ चपाती फस्त करते .ज्याच्याजवळ भरपूर खाण्यासाठी आहे तो खाऊ शकत नाही व ज्याच्याजवळ खायला नाही त्याच्याजवळ खूप भूक असते असा विचित्र विरोधाभास आहे .दुसरी गोष्ट म्हणजे झोप .जगाच्या बाजारात झोप ही काय विकत मिळत नाही काही व्यक्तींना जमीनीवर तसेच बसल्या बसल्या जागेवर झोप लागते पण काहींचा बिछाना प्रचंड महागडा असतो पण झोप येत नाही .झोप न येण्याचे अनेक कारणे आहेत .झोप पुरेशी न झाल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागतो .तिसरी गोष्ट म्हणजे माणसाला मिळालेले आयुष्य .जेवढे आयुष्य मिळाले त्यापेक्षा जास्त एक सेकंदही आयुष्य माणसाला कितीही करोडो मोजले तरी मिळत नाही म्हणजेच जगात पैशांची किंमत आहेच पण वरील तीन गोष्टी माणसाने कितीही पैसे मोजले तरी मिळत नाही .औषधे घेऊन झोप मिळणे व नैसर्गिक झोप मिळणे यात जमीन आसमानचा फरक आहे ज्या व्यक्तीजवळ नैसर्गिक झोप व भूक असेल तो जगातला भाग्यवान माणूस व ज्या व्यक्तीजवळ पैसा असेल व त्याबरोबरच नैसर्गिक भूक व नैसर्गिक झोप असेल तर अशी व्यक्ती महाभाग्यवान म्हणावी लागेल .बघा पटतं का.
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment