फक्त एकदाच
माणसाला व्यसन लागते ते एखादे वेळी घेतले तर काय होते असे म्हणण्यामुळेच मग आता हे शेवटचे घेतो याच्यापुढे नाही असे प्रत्येक वेळी म्हणत माणूस ते घेत जातो व घेतल्यानंतर पश्चाताप येतो की का घेतले? पण परत काही दिवस गेल्यावर परत त्याचा त्याच्यावर ताबा नसतो व हे फक्त शेवटचेचं असे म्हणत तो घेतो व असे करता करता किती वर्ष निघून जातात पण ती गोष्ट त्याला कधीच काढून टाकता येत नाही .काही वाईट सवयी ह्या यामुळेच लागतात व अशा चिकटतात की पुन्हा त्या काढुन टाकता येत नाही .काढून टाकण्यासाठी मनाचा निग्रह त्याग हा प्रचंड प्रमाणात लागतो व ह्या ज्या सवयी आहेत त्या जीवनाचे अंतिम सत्य नाही असे जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा त्या वाईट सवयी काढून टाकणे सोपे जाते .हे फक्त एकदाच घेतो असे जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा तो फसतो व अडकतो त्या सवयींमध्ये व त्या सवयी त्याला गुलाम करतात .हवे तेव्हा त्या त्याला नाचवतात व तो ही नाचतो कारण त्यांच्या तो अधीन झालेला असतो .त्या सवयीमुळे कुणीही कितीही सांगितले तरी त्याला ते खरं वाटत नाही .कुणाचे तो ऐकुनच घेत नाही व त्या सवयी त्याला बरबाद केल्याशिवाय सोडत नाही .चांगल्या सवयीचा माणूस गुलाम झाला तर त्या त्याला प्रगतीपथावर नेतात पण वाईट सयींचा गुलाम त्याला नरकात ढकलतात .तसे पाहिले गेले की चांगल्या व वाईट सवयींचा गुलाम माणसाने होऊच नये .त्या सवयींवर त्याचा हुकूम चालला पाहिजे .हव्या तेव्हा त्याने त्यांना नाचवायला हवे पण ते शक्य होत नाही.बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment