महागड्या घरातील नादुरूस्त उपकरणे
आपण घर घेतांना किती तरी विचारपूर्वक घेत असतो मग लाखांपासून करोडपर्यंत घर असते मग घरात फर्निचरही महाग असते घराला शोभेल असेच घेत असतो .आपण घर व घरातील सामानासाठी लाखो करोडो खर्च करत असतो पण माझ्या पाहण्यात असे अनेक घर आहेत की ज्यांची किंमत करोडो रूपये आहे पण घरातील ऊपकरणे नादुरूस्त झालीत तर ते दुरूस्त करायला आपल्याकडे वेळ नसतो व त्या नादुरुस्त असलेल्या तशाच वापरतो उदा. फॅन बिघडलेला असतो . फॅनचा स्पिड एकदम कमी असतो हवाच लागत नाही किंवा काहींचा स्पिड एवढा असतो की रेग्यूलेटरमधील बिघाडामुळे त्याचा स्पिड कमी जास्त होत नाही व एवढी साधी गोष्ट असुनही आपण दुर्लक्ष करतो व तो त्रास सहन करतो अनेक वर्ष .तसेच एखादी ट्यूबलाइट किंवा बल्ब खराब झालेला असतो व किती तरी दिवस तो दुरूस्त होत नाही तसेच एखादा कुकर असतो त्याची शिट्टी किंवा रिंग खराब झालेली असते व ते दुरूस्त करायचा आपल्याला कंटाळा येतो. काही घरात तर एसी दिसायला ठेवलेला असतो पण कुलिंग होतच नाही आणि तो दुरूस्त करण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो तसेच खुर्चीचे पाय मोडलेले असतात बेडही काही ठिकाणी मोडलेला असतो टीव्ही नादुरूस्त अवस्थेत पडलेला असतो .साध्या गोष्टी आहेत पण त्या दुरूस्त करायला किती तरी वर्ष निघून जातात तसेच अनेक कोपर्यात जळमटं झालेले असतात व ते जळमटं आरसा फॅनच्या वरती भिंतीवरती जमा होतात व आपण बघूनही दुर्लक्ष करतो अनेक तुटलेल्या वस्तू घरात जमा करून ठेवतो त्या फेकायलाही आपल्याकडे वेळ नसतो .अनेक चपला तुटलेल्या आपण जमा करून ठेवतो त्या फेकुन द्याव्या असे आपण मनावर घेतच नाही म्हणून म्हणावेसे वाटते महागड्या घरातील बिघडलेल्या वस्तू व त्या दुरूस्त करण्याकडे आपले झालेले दुर्लक्ष व त्या आळसामुळे उगीचच त्रास सहन करत असतो म्हणून विचार करा आपल्या घरातही अशी स्थिती आहे का मग उठा आळस झटका व एकदा त्या दुरूस्त करून टाका व उगीचच त्रास सहन करू नका .बघा जमतं का
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment