स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र मिळविले वीरांनी
मुक्त केली ही भारतमाता
सोसल्या त्यांनी हाल अपेष्टा
नाही केली आपल्या संसाराची चिंता
प्राणाची बाजी मारून
लढले ते भारत मातेसाठी
मुक्त केले तिला जोखडातून
रक्त सांडले तिच्यासाठी
कुणी गेले फासावर
तर कुणी भोगली काळ्या पाण्याची शिक्षा
एकच त्यांचा ध्यास होता
करायची होती भारत मातेची रक्षा
कुणी केलेत आंदोलने
तर कुणी केला सत्याग्रह
रात्रंदिवस झटून सार्यांनी
सुरु केला स्वातंत्र लढ्याचा प्रवाह
कुणी झेलल्या छातीवर गोळ्या
तर कुणी केली परदेशी वस्तूंची होळी
भारत मातेच्या मुक्ततेसाठी
खर्ची घातली आपल्या तारुण्यांची झोळी
त्यांच्या बलिदानाचे करू या
आज आपण स्मरण
आज भोगतो आपण स्वातंत्र
वेचले त्यांनी त्यासाठी आपले प्राण
भारतमातेचा जयजयकार करत
वाट लावली त्यांनी शत्रूंची
सळो की पळो करुन सोडले
त्यासाठी आहूती दिली त्यांनी आपल्या संसाराची
भारतमातेवरचा अन्याय बघून
झोप उडाली होती स्वातंत्रवीरांची
तिच्या मुक्ततेसाठी नाही पर्वा केली
त्यांनी आपल्या बलिदानाची
तिच्या स्वातंत्र्यांसाठी कुणी
लढले आपल्या देशातून
तर काहींनी लढा
उभा केला परदेशातून
स्वातंत्र मिळाल्याने आनंदली
आपली प्राणप्रिय भारतमाता
आपल्या लेकरांच्या बलिदानाने
अश्रू थांबत नव्हते तिचे आता
चंद्र सूर्य आहेत जोपर्यंत
तोपर्यंत राहील स्वातंत्र अबाधित
स्वातंत्र वीरांच्या प्राणांचे मोल
राहील आपल्या कायम स्मरणात
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment