पश्चाताप
होतो पश्चाताप पंधराव्या वर्षी
मित्रांशी उगीचच लहाणपणी भांडल्याचा
आता वाटते त्या मित्रांविषयी प्रेम
राग येतो मात्र आता स्वत:चा
पश्चाताप होतो पंचविसाव्या वर्षी
अभ्यांस सोडून मुलीच्या नादाचा
तिचे मात्र झाले चांगले करियर
मी फिरतो मात्र बिगर पदवीचा
पश्चाताप होतो तिसाव्या वर्षी
तिच्याजवळ मन न मोकळे करण्याचा
तिच्यापर्यंत पोहोचल्याच नाही माझ्या भावना
आता फुटतो बांध अश्रूंचा
होतो पश्चाताप चाळीसव्या वर्षी
कदर नाही केली पत्नीच्या प्रेमाची
ती मात्र ऐकत राहिली माझे
मला नशा होती माझ्या धुंदीची
पश्चाताप होतो पन्नासाव्या वर्षी
नाही बचत केली पैशांची
जे मिळाले ते उधळत राहिलो
आता खूप गरज आहे त्यांची
पश्चाताप होतो साठाव्या वर्षी
योग व्यायाम न केल्याचा
आता काढतात आजार डोके वर
पार भुगा होतो झोपेचा
पश्चाताप होतो पंचात्तराव्या वर्षी
नाही भजन केले देवाचे
कधीही यमदूत येऊ शकतो
काय होईल माझ्या पुढच्या प्रवासाचे
वेळ जातो आता पश्चातापात
काहीच केले नाही आयुष्यात
जवळ कुणीच नाही फिरकत माझ्या
मीच लिहिले असे माझ्या नशिबात
पश्चाताप होतो सारखा मला
करत राहिलो माझे तुझे
प्रेमाची भाषा नाही कळाली मला
रंजल्या गांजल्यासाठी जगायचे राहिले माझे
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment