Skip to main content

उर्जा

उर्जा

आपल्या शरिरात भरपूर उर्जा असते पण विनाकारण तिचा आपण खर्च करतो .घरात तसेच बाहेर नको त्या गोष्टीला महत्व दिल्यामुळे उर्जा खर्च होत असते .नको ती वायफळ बडबड करणे किंवा ऐकणे यात बरीच उर्जा जाते .घरात क्षुल्लक गोष्टीवर वादविवाद होतात व त्या वादाचे रूपांतर  टोकाची भूमिका घेते व होती नव्हती तेवढी उर्जा खर्च होते.बसमध्ये ट्रेनमध्ये किंवा रस्त्याने चालताना कुणाचा चुकून धक्का लागतो व त्यावरून आपण हमरीतुमरीवर येतो व  बरीच उर्जा वाया जाते .रिक्षावाल्याशी सुट्या पैशांवरून भांडण होते व उर्जा महत्वाची की सुटे पैसे याचे महत्व न कळल्यामुळे उगीचच एक दोन रुपयांवरून भांडत बसतो.आता ही उर्जा कशी वाचवता येईल? बर्‍याच वेळा जेथे वाद होऊनही काहीच  आपल्याला हवे ते मिळणार नसेल तर मौन राहिलेले बरे .एकटे जेव्हा असतो तेव्हा डोळे बंद करून निर्विचार स्थिती निर्माण करून उर्जा मिळवता येईल व बचतही करता येते .बरीच ऊर्जा रागामुळे खर्च होते तेव्हा राग थोडा ताब्यात ठेवला तर उर्जा वाचवता येईल तसेच शत्रू लोकांचे आपण चिंतन करतो व त्या चिंतनात बरीच उर्जा नष्ट होते तसेच जे घडून गेले त्याचा जास्तच विचार केल्यामुळे उर्जा खर्च होते तसेच भविष्यात काय होईल या भीतीनेही उर्जेचा नाश होतो .ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्या भीतीमुळे बरीच उर्जा नष्ट होते त्यामुळे भीती वाटते त्या गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत त्यामुळे मनावरील ताण कमी होतो व उर्जा वाचते.बरीच उर्जा नको त्या गोष्टीचे वाचन तसेच नको ते बघणे आणि नको ते ऐकणे यामुळे बरीच उर्जा खर्ची पडते.ज्या गोष्टीमुळे शरीरात विकार उत्पन्न होतात व मन सैरभैर होते तेव्हा समजायचे की उर्जा खर्च होते व ज्या गोष्टीमुळे मन शांत समाधानी आनंदी होते तेव्हा उर्जा आली असे समजावे .बर्‍याच वेळेला उर्जा नष्ट होते व मन आनंदी होते .एखाद्या व्यक्तीशी भांडण केले की काहींना आनंद वाटतो व बघा कसा धडा शिकवला असा टेंभा मिरवतात व आनंदी होतात पण यात उर्जा खर्ची झाली याचे भानच त्याला नसते म्हणून तिची बचत व खर्च यामध्ये बारीक रेषा आहे ती समजली तर मग समजणे सोपे होऊन जाते. हीच उर्जा आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती म्हणून कार्य करते अनेक रोगांवर मात करण्याची क्षमता तिच्यात असते आत शरीरात कोणत्या रोगांच्या जंतूशी लढते याचा थांगपत्ता नसतो आपल्याला पण ज्याची उर्जा खर्च झाली आहे ते रोगांचे शिकार होतात शरीराच्या व्याधी सुरू होतात व त्या हाताबाहेर जातात म्हणून उर्जेचे किती महत्व आहे .योग्य आहार योगा व्यायाम योग्यआचार विचार  यांच्यामुळे शरिरात उर्जा निर्माण होते .सकारात्मक दृष्टिकोनामुळेही उर्जेची बचत होते तर नकारघंटामुळे उर्जा नष्ट पावते.बघा विचार करा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...