आपले लक्ष
दैनंदिन जीवन जगत असतांना नेहमी आपले लक्ष दुसर्यांकडे असते .आपण कसेही वागलो तरी आपली चूकच नाही असे बोलून मोकळे होतो .चूक असेल तर ती दुसर्याची आपली नाही याचा अर्थ आपण आपल्यापेक्षा दुसर्याला जास्त ओळखतो .आपले लक्ष कधीही आपल्याकडे नसते .नेहमी दुसर्यावर खापर फोडून आपण मोकळे होतो .दुसर्यामधील चांगले गुण न दिसता फक्त वाईट गुण आपल्याला दिसतात व आपल्यातले वाईट गुण न दिसता फक्त चांगले गुण दिसतातयाचा अर्थ समोरच्याला व आपल्याला आपण पुर्णता ओळखलेच नसते.दुसर्यातले चांगले किंवा वाईट गुण दिसणे हे आपल्यावर अवलंबून असते .जशी आपली नजर तसे आपल्याला दिसते म्हणून समोरच्यातील चांगले बघायचे असेल तर आपली नजर आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे प्रथम स्वत:चा अभ्यांस आपण केला पाहिजे व तरच हवे ते आपल्याला बघता येईल .एखादी आपली चूक झाली व तरीही आपण म्हणतो की नाही मी कधी चूक करूच शकत नाही तेव्हा आपली आतली प्रगती शून्य आहे असे म्हणता येईलव ज्यावेळी आपण केलेली चूक आपल्याला बोचते .पश्चातापाच्या आगीत आपण होरपळून निघतो .चुकीच्या वागण्याच्या बोलण्याच्या विचाराने झोपेचे खोबरं होते मन सैरभैर होते .आपल्याला आपलाच राग येतो तेव्हा समजावे की आपली आतील प्रगती छान चालली आहे .पुढे मग त्या व्यक्तीची माफी मागतो व झालेल्या चुकीबद्दल sorry होऊन मोकळे हते .ही माफी किंवा साॅरी दुसर्याला सुखवण्पासाठी नसून तर आपले सैरभैर झालेले मन शांत करण्याची ती एक गुरू किल्ली आहे आपल्या चुकीबद्दल दुसर्याला sorry बोलणे यालाही खूप धाडस लागते व दुसर्याने चुक करूनही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून त्याला माफ करणे हेही तेवढेच धाडसाचे काम आहे दया क्षमा शांती हे अंगी बाळगणे एवढे सोपे मात्र नक्कीच नाहीआणि ज्या गोष्टी कधीतरी संपणार आहेत त्याबद्दल जास्त सिरियस होण्याची गरज नाही हे पटणे एवढेही सोपे नाही.बघा पटतं का
प्रा.दगाजी देवरे
Comments
Post a Comment