नंदलाल
कृष्ण कृष्ण म्हणताच
आकर्षित होतो माणूस
देहभान जातो विसरुन
आहे त्याचे हे गुण खास
देवकीपोटी जन्म घेऊन
यशोदा घरी वाढला
अनेक दुर्जनांचा वध करून
कंसालाही त्याने संपवला
विश्वरूप दर्शन दाखवून
सिध्द केले मीच आहे देव
ते बघून अर्जून झाला अचंबित
स्तुती करू लागला घेऊन कृष्ण नाव
झाल्या होत्या गोपीका
त्याच्यामुळे फार वेड्या
दुध दही विकतांना म्हणत होत्या
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या
राधेवर होते त्याचे विशेष प्रेम
राधाही होती त्याच्यासाठी बावरी
होते तिला सारे माहीत
हाच आहे विश्वाचा मुरारी
कृष्ण कृष्ण म्हणताच
लागते ब्रम्हांनंद टाळी
आहे त्याचे नाम गोड
घ्यावे ते कधीही वेळी अवेळी
म्हणतो तो या मला शरण
वाहीन योगक्षेमं तुमचा
व्हावे आपण निश्चिंत
विश्वास ठेवावा त्याचा
नाही सहन केला त्याने अन्याय
पाठवले शत्रूंना यमसदनी
मीच आहे विश्वाचा राणा
हे दिले त्याने वेळोवेळी पटवूनी
निभावली त्याने मैत्री
सुदामाला देऊनी सुवर्णनगरी
असा होणे नाही पुन्हा मित्र
आहे त्याचा नंबर सगळ्यांच्या वरी
मिराबाईलाही लागला होता
चांगलाच छंद त्याचा
त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हते
लळा लागला होता त्याच्या नामाचा
इंद्राचा गर्व केला त्याने रिकामा
गोवर्धन पर्वंत उचलून
बघून त्याचा पराक्रम
आला होता इंद्र त्याला शरण
बासरीत भरून स्वर
मंजूळ येत होते गाणे
होत्या त्याला गाई आवडत्या
सगळ्यांना वेड लावते होते त्याने
अर्जुनाचा सारथी बनून
केला कौरवांचा पराभव
सांगितली अर्जुनाला गीता
झाला तो विश्वाचा महामानव
गोविंद गोपाळ हरि मुरारी
करु या आज त्याचे भजन
जातील सर्व संकटे दूर
निवारील तो नारायण
असा कृष्ण पुन्हा होणे नाही
ज्याने घेतला होता भारतभूमीत जन्म
करूया त्याची जन्माष्ठी साजरी
सांगू या घे या मातीत पुन्हा जन्म
प्रा. दगाजी देवरे
7738601925
Comments
Post a Comment