शिक्षणव्यवस्था
शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करून
करावा बदल तिच्यात छान
मिळायला हवे तरुणांना काम
ज्याच्यात त्यांचे रमेल मन
आजचे शिक्षण घेऊन
बरेच आहेत बेरोजगार
फिरता आहेत गल्लोगल्ली
त्यांची संख्या झाली फार
शिक्षण घेऊनही त्यांना
मिळत नाही नोकरी
फक्त डिग्री आहेत हाती
त्याने मिळत नाही लग्नाला छोकरी
शिक्षणाने व्हावा आजचा तरुण
स्वत:च्या पायावर उभा
नसाव्या त्याला कुणाच्या कुबड्या
अभिमानाने मिरवावा त्याने टेंबा
त्याला बघताच शिक्षण
दिसावे त्याच्यात
यावा त्याच्यात संयम
दिसावा तो त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात
शिक्षणाने बनावा तो माणूस
असावी त्याला माणूसकी
त्याने होईल घर समाज देश सुंदर
अन् होईल सगळ्यांची तरक्की
शिक्षणाने रुजवावीत नितीमूल्ले
त्याच्या अंगी
होतील कमी खून मारामार्या बलात्कार
होईल प्रत्येक जण सुखी जगी
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment