अती तेथे माती
जातो पाहूणे म्हणून
आपण कुणाच्या तरी घरी
करू नये जास्त दिवस मुक्काम
म्हणायची वेळ आणु नये त्यांना निघा आता तरी
करु नये वायफळ बडबड
जेथे जातो तेथे आपण
लोक जातात त्यामुळे दूर
राखण्यासाठी शांत आपले मन
जे दिसेल ते खाऊ नये काही
वेळ काळ हा बघावा
पोट नाही राहिले आवाक्यात
त्याचा थोडा तरी विचार करावा
गरजेपुुरते साधने करावी जमा
इतर देऊन टाकावीत कुणाला
भागेल त्यांचीही गरज
अन् दुवा मिळेल तुम्हांला
अती रागीट करतो
संसाराचा फार विचका
नसतो त्याचा त्याच्यावर ताबा
स्वत:च तोडतो स्वत:चा व इतरांचा लचका
झोपेलाही असावी मर्यादा
उठून वाटावे ताजेतवाने
कायम झोपच घ्यावी
आहेत ते आळशीपणाचे लक्षणे
पैशांसाठी धावू नये
सकाळ संध्याकाळ रात्र
पैसे आपणासाठी आहेत
नसतो आपण पैशांसाठी मात्र
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment