जारे जारे पाऊसा
जा रे जारे पाऊसा
विनवितो मी तुला
सगळीकडे झाले पाणीच पाणी
लोकांचे हाल कसे बघवतं तुला
धरणे भरले बंधारे भरले
नद्यानाल्यांना आला पूर
लोकांच्या घरात घुसले पाणी
माजवला तु सगळीकडे हाहाकार
रेल्वे बंद रस्ते बंद
पाण्याखाली गेले सारे
म्हणून वाटते पावसा
थोडे दिवस तु आता दूर जा रे
बरसून बरसून तुला
आला नाही का रे थकवा
एरवी देत असतो
कायम तू लोकांना चकवा
या वर्षी एकाच वेळी
का रे तू एवढा बरसतो
लोकांच्या घरी नाही खायला काही
तू मात्र गंमत बघत बसतो
काही गावात वीज नाही
नाही पिण्याचे पाणी
लोकांची झाली आहे दैना
वाटते नाही वाली त्यांना कुणी
बंद झाले पशुपक्ष्यांचे
मधूर मधूर गाणे
नाही त्यांना राहिले घरटे
मिळत नाही त्यांना खायला चणे
देवाने पाऊसाचा मालक बदलला
असे वाटते आता मला
नवीन पद मिळाल्याने
चांगलाच तो कामाला लागला
जा रे जारे पाऊसा
तुला देतो पैसा
आता घे तू विश्रांती
नको घुडगूस घालू असा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment