केले कर्म झाले तेचि भोगा आले
आपण सकाळ पासून रात्रीपर्यंत कर्म करत असतो काही जण दुसर्याला चांगले वाटावे म्हणून कर्म करतात .दुसर्याला आनंद वाटावा म्हणून कर्म करतात काहीजण नुसता देखावा करतात परंतु प्रत्यक्षात काहीच करत नाही काहींना वाटते मी कर्म चांगले केले की वाईट हे कुणी बघत नाही म्हणून मनाला वाटेल तसे वागतात व त्या कर्माचा परिणाम काय होणार याचा साधा विचारही करत नाही पण जरी कुणी बघत नसेल तर नियती नावाचा बिग बाॅस सतत कॅमेरा लावून बसलेला असतो व तो काय आकाशात बसलेला नसतो आपल्याच शरिरात तो कॅमेरा लावून बसलेला असतो की आपण काय करतो व त्याप्रमाणे तो कर्माच्या फळामध्ये हस्तक्षेप करत नाही जसे कर्म तसे फळ मग तो राजा असो की रंक असो सगळ्यांना समान न्याय देत असतो म्हणून कुणीच बघत नाही काही केले तरी असा गैरसमज काढून टाकला पाहिजे व कुणाची तरी नजर आहे आपल्यावर अशी भावना तयार झाली तर मग वाईट कर्म आपल्या हातून सहसा घडणार नाही .जरी कुणी नाही बघितले तरी स्वत:आपण तर बघितले आपण काय केले व जशी क्रिया तशी प्रतिक्रिया नक्कीच मिळते काहीच्या डोक्यात सत्ता पैसा यांचा माज असा चढतो की दुसरे त्यांना तुच्छ वाटायला लागतात व सत्तेच्या जीवावर तसेच पैशांच्या जीवावर आपण काय करतो याचे त्यांना भानच नसते एक प्रकारची गुर्मी चढलेली असते नशा चढलेली असते पण त्यांना त्यांचा हिशोब चुकता करावाच लागतो .वाईट कर्म करणे फार सोपे असते पण त्याचे परिणाम खूप भयंकर असतात आणि चांगले काम करणे अवघड असते पण त्याचा मोबदला फार छान असतो व काहीजण हे असले काही मानत नाही व तेथेच फसतात व त्यातुन बाहेर निघणे अवघड असते .संत ज्ञानैश्वर महाराज म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथिची मुकला हरिपाठ स्थिरावला तोचि धन्य .म्हणून दैनंदिन कर्म करताना सावधानता बाळगलेली बरी असते व आपल्या सर्व कर्माचा हिशोब कुणीतरी ठेवणारा आहे व त्याचे फळही आपल्याला तसे मिळणार याची जाणीव माणसानै ठेवली पाहिजे .सत्ता पैसा यांचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या चेहर्यावर आनंद येण्यासाठी वापरला तर नक्कीच त्याचाही हिशोब ठेवला जाईल म्हणजेच आपण स्वत:च आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो व सुखदु:खाचा कारण असतो . आपल्या वाईट कर्माची पोतडी भरली की मग वाईट दिवस सुरु होतात .सुरवातीला कितीही वाईट केले तरी सुख आनंद त्याच्या पायाजवळ लोळण घेतात पण एकदा पोतडी भरली की मग तो त्यातून वाचवू शकत नाही उलट जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना सुरवातीला दु:खात दिवस काढावे लागतात पण चांगल्या कर्माची पोतडी भरली की मग सुख समाधान शांती त्यांच्या पायावर लोळण घ्यायला धावत येते .बघा पटतं का
प्रा दगाजी देवरे
Comments
Post a Comment