मृत्यूपुढे लाचार
होतात तुझ्यापुढे लाचार
आणि जिंकतो तूचं शेवटी
माणूस आहे एक बाहूले
करतो तू संबंधाच्या ताटातूटी
तूला पाहताच गळून पडतो
भल्याभल्यांचा गर्व अन् अहंकार
होते माणसाची घाबरगुंडी
कारण तू नेतो त्यांना आपल्या बरोबर
पैसा सत्ता सौदर्य आहे
तुझ्यापुढे सारेे नगण्य
आहे तू हुकूमाचा ताबेदार
करतो नियतीचेच मान्य
तू कोणत्या रुपात येशील
हेच माहीत नसते माणसाला
क्षणातच होत्याचे नव्हते करतोस
हे जमतं फक्त तुला
भलेभले लोकं तुझ्या भयाने
होतात स्वभावात नम्र
तु आहे म्हणून जग आहे
नाहीतर माणूस नसता झाला विनम्र
गरीब श्रीमंत स्री पुरूष
हा नाही करत तू भेदभाव
तरूण म्हातारे बालक
यांच्याप्रती आहे सारखाच तुझा भाव
जेवढे येणार तेवढ्यांना नेणार
हेच तुझे आहे दैनंदिन काम
माणूस मात्र विसरतो तुला
दिवस रात्रं त्याच्या विचारात असतो दाम
काहींना नेण्यापुर्वी करतो
शरीराने पूर्ण खिळखिळा
रोज ते बघतात तुझी वाट
तू हसतोच त्यांना पाहुन खळखळा
काहींना तू खरंच हवा असतो
जीवनाला ते असतात कंटाळलेले
तू फिरवतोस त्यांच्याकडे पाठ
तुला नको असतात असे मरगळलेले
जेथे होतो हरीचा उच्चार
तेथे वाटते तुला भिती
तो आहे तुझा स्वामी
त्याला तु थरथर कापती
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment