हलके व जड
खोटेपणा असतो फार हलका
उडत उडत जातोचारी दिशा
खरेपणा असतो फार जड
न उडता काढतो तो उठाबशा
चुकीची गोष्ट वेगात फिरून
सांगत सुटते याला त्याला
चांगली गोष्ट घडली तरी
माहीत पडत नाही कुणाला
निंदा नालस्ती करायला
नाही बघतात काळवेळ
स्तुती दुसर्याची करताना
येते जीभेला मरगळ
बरेच वर्ष केली चांगली गोष्ट
लोक घेतात त्याला डोक्यावर
एखादी झाली त्याच्याकडुन चुक
लोक आपटतात त्याला जमीनीवर
कसे वागावे जगावे कसे
हे ठरवावे प्रत्येकाने
आपला त्रास दुसर्याला नको
हे लक्षात ठेवावे प्रत्येक व्यक्तीने
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment