Skip to main content

झूम

झूम
मोबाईल आल्यापासून झूम याचा अर्थ सगळ्यांना अवगत झाला .काही फोटो लांबून काढलेले असतात त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही त्यावेळी आपण झूम करुन तो फोटो बघतो व मग चेहरा स्पष्ट दिसू लागतो किंवा लांबचा फोटो किंवा शुटींग करायची असते तेव्हा आपण कॅमेरा झूम करतो व लांबचे दृश्यही चांगल्या प्रकारे टिपता येते त्यावरुन कोणती गोष्ट झूम करून पाहावी किंवा कोणती पाहू नये याचे ज्ञान असणे गरजेचे आहे .जीवनात बर्‍याच सुखदु:खाच्या घटना घडतात तेव्हा दु:खाच्या घटनेचा  विचाराने झूम करून त्याचे चिंतन करू नये पण सुखाच्या ज्या गोष्टी घडल्या त्या मात्र मनात झूम करुन पुन्हा पुन्हा पाहाव्यात त्यामुळे आनंद निर्माण होईल .संपूर्ण जीवन जगत असताना होणार्‍या घटना झूम करूच नये त्यामुळे त्यातील बारीक बारीक गोष्टीमुळे आपण व्यथीत होणार नाहीत.झूम न केल्यामुळे छोट्या गोष्टीमुळे होणारा मनस्ताप  आपला वाचेल .गुगल मॅपमध्ये जेव्हा एखादे ठिकाण शोधायचे असते तेव्हा जेवढे झूम करणार तेवढे बारीक बारीक ठिकाणे दिसू लागतात  आणि झूम नाही केले तर फक्त ठळक मोजकेच ठिकाणे दिसतात तसेच जीवनाचे आहे .जेवढे झूम करून आपण गोष्टी आठवणार तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात .चांगल्या असतील तर आनंद देतात व वाईट असतील तर दु:ख देतात .संताच्या बाबतीत सांगायचे झाले तर देवाच्या बाबतीत ते झूम करतात व त्यामुळे तो परमात्मा कसा दिसतो   ते त्यांना कळते .काही तर एवढे झूम करतात की परमात्मा त्यांच्याशी बोलतो खेळतो कायम त्यांच्याच बरोबर आहे हे त्यांना दिसायला लागते व ते तो अनुभव वर्णन करतात पण आपल्या सारख्या सामान्य माणसाला त्यातला कोणताही अनुभव येत नाही कारण आपण कधी त्याच्या बाबतीत झूम करण्याचा कधी प्रयत्नच केलेला  नसतो त्याउलट संत संसाराला कधीच झूम करून बघत नाही त्यामुळे संसारातील सुखदु:खाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही म्हणजेच संसारातील कोणत्याही गोष्टीने ते विचलित होत नाही पण आपण मात्र संसार करताना मनाचा कॅमेरा झूम करून बसलेलो असतो त्यामुळे हा काय बोलला ती काय बोलली यामुळे आपल्याला कधी राग येतो द्बेष येतो कधी आनंद होतो तर कधी दु:ख म्हणजेच मन सदा चंचल असते म्हणून झूम करुन कोणती गोष्ट आठवावी व कोणती नको याचे ज्ञान झाले तर किती बरे होईल.कृष्णाजवळ तर असा मनाचा झूम कॅमेरा होता की सारे विश्व त्याने मनाच्या कॅमेर्‍यात बंद करून अर्जुनाला दाखवले सुरवातीला अर्जुनाला काहीच दिसत नव्हते मग त्याचाही मनाचा कॅमेरा त्याने झूम करून दिला व मग अर्जुनही बघू लागला व आश्चर्याने बघण्याशिवाय काहीच उरले नव्हते .म्हणून झूम करून कोणत्या गोष्टी बघायला पाहिजे हे शेवटी प्रत्येकाच्या हातात आहे व त्यावरुनच आपण कोणत्या स्थितीला पोहचलो याची कल्यना येईल .बघा पटतं का व पटत असेल तर जमतं का बघा
प्रा. दगाजी देवरे
7738601925

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...