Skip to main content

प्रेम स्वत:वरील

स्वत:वरील प्रेम

राहूनच गेले स्वत:वर
मनापासून प्रेम करायचे
अडीअडचणींचा सामना करत
स्वत:कडे दुर्लक्ष झाले कायमचे

भाकरीचा चंद्र मिळविण्यात
खर्च झाले बरेच दिवस
स्वत:च्या भावभावनांचा कधीच
विचार केला नाही खास

आपल्या आवडीचा कधीच
विचार आला नाही मनात
बरेच वर्ष  निघून गेले
इतरांचा विचार करण्यात

वजन वाढले पोट सुटले
झाले दुर्लक्ष माझ्याकडे
अनेक आजारांनी डोके वर काढले
वेळ निघून गेली आता फार  पलीकडे

देवाचे भजन करायचे होते मला
वेळेचे गणितच नाही जमलं
सारखा धावत होतो मी
पण सुख मला नाही कळलं

वाचन चिंतन मनन बरोबर
योग व्यायाम शांती साधायची होती मला
मी म्हणजे एकटाच ज्ञानी
ही भ्रामक कल्पना होती मला

निसर्गाच्या सानिध्यात भटकंती
करायची होती मला
मी मी तू तू करण्यातच
मात्र वेळ  मी वाया घालवला

आपल्यावाचून कुणाचचं अडत नाही
हे पटलं मला मनापासुन
एवढे वर्ष उगीच वाया गेले
स्वत:चे जगणं गेले राहून

माझ्यासारखे किती आले अन् गेले
हे समजण्यास झाला मला उशिर
ज्याला योग्यवेळी गुरू भेटला
त्याचे नशीब असते मात्र थोर

आता हे कळले  हे ही
काही कमी नाही
देवाचे मानतो मी आभार
म्हणून आता जगायला करावी लागेल घाई

प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...