आहे पण नाही
दिसते क्षणापुरते वाटते खरे
आपणास जीवन येथे
असते ते मृगजळ
फसतो माणूस तेथे
असते आयुष्य क्षणाएवढे
भासते ते परीपूर्ण
काही केले जरी
तरी ते असते अपूर्ण
आज जे आहे ते उद्या नाही
उद्या मात्र कधी येतच नाही
माणूस जगतो उद्याच्या आशेवर
आशा मात्र पूर्ण होतच नाही
वय सौदर्य हे कधी टिकत नाही
क्षणोक्षणी असते ते ओसरणारे
नको असावा त्यावर गर्व
ते कधीच नसते कायम टिकणारे
पदव्या सत्ता पैसा हे आहे
नियतीपुढे मातीसमान
माणूस मात्र गर्वाने फुगतो
एक दिवस जातो फुगा फुटून
खरे काय अन् खोटे काय
हेच नाही अजून समजलं
खोट्या भ्रमात राहून
मृत्यूकडे चालली मात्र वाटचाल
खर्याची जेव्हा होईल ओळख
तेव्हा हातात नसतील दिवस
खरा गुरू जेव्हा लाभेल
तेव्हा तो दिवस असेल खास
संसार खेळते नियती
आपण बनलो खेळणे
जेवढी भरते ती चावी
तेवढेच असते आपले धावणे
माणूस नुसता धावतो
माहीत नाही काय मिळवण्यासाठी
जे तो मिळवतो कष्टाने
त्याची होते एक दिवशी माटी
जे मिळवले त्याचा
कधीच होऊ नये नाश
ते मिळवल्यानंतर काहीच
राहू नये माणसाभोवती पाश
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment