शिक्षकदिन
शिक्षकाशिवाय या जगात
नाही कुणी मोठे
करतो कच्चे मडके पक्के
नाही वागत कधी खोटे
शिक्षकांमुळेच मिळालेत
बर्याच जणांना मोठे पद
पदांवर गेल्यावर शिक्षकांशीच
बरेच जण घालताना दिसतात वाद
काळ्या बोर्डवर पांढर्या खडूने
शिक्षकांनी करून दाखवली कमाल
गरीब झालेत शिक्षकांमुळे श्रीमंत
आणि झालेत पैशाने मालामाल
शिक्षकांनी माणसातली माणूसकी
केली समाजात जागी
म्हणून शिक्षकांना एकच उपमा शोभते
ती म्हणजे त्यागी
पंतप्रधान पदही आहे
शिक्षकापुढे फार छोटे
त्या पदावर पोहचवून दाखवणारे
शिक्षक आहेत सर्वात मोठे
ज्ञानदानासारखे श्रेष्ठ दान नाही
असे सांगतो प्रत्येक धर्म
म्हणून शिक्षकांनीही करावे
ज्ञानदानाचे निस्वार्थी कर्म
शिक्षक आहे एक जादूगार
घडवतो तो विद्यार्थ्यांना
चमक दाखवतात विद्यार्थी
त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो शिक्षकांना
शिक्षक समोर दिसताच
जायला पाहिजे हात त्यांच्या चरणाजवळ
मातीला दिला त्यांनीच आकार
म्हणून हात पोहचले आपले गगनाजवळ
पहिली शिक्षक असते
आपली प्रेमळ आई
चालण्या बोलण्याचे तिच शिकवते
म्हणून ती आपली पहिली शिक्षकबाई
आपल्या शिक्षकांना देऊ या
आज खूप खूप शुभेच्छा
त्यांच्यामुळेच आपल्या पूर्ण झाल्यात
मनातील सर्व इच्छा
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment