बाप्पाचे मनोगत
काय सांगू आई तुला
किती मजा आली पृथ्वीवर
मोदकांचा नैवैद्य येत होता रोज
खाल्ले मी आई मोदक भरपूर
पैसा सोने चांदी अर्पण
करत होते भक्तजन
त्यांच्या भक्तीने बाबा
प्रसन्न झाले माझे मन
अनेक लोकांच्या समस्या
केल्या मी कायमच्या दूर
त्यामुळे भक्तजन कधीच
जाणार नाही माझ्यापासून दूर
तासनतास लोक माझ्यासाठी
उभे राहायचे रांगेत
माझे दर्शन त्यांना होताच
आनंद मावत नव्हता त्यांच्या मनात
पाऊस भरपूर पाडला
शेतकर्याच्या मी शेतात
शेतकरी झाले आनंदी
बघून पाणी धरणात
ओढ लागली होती मला
आपल्या घराची
माझ्या निरोपाने लोक रडत होते
काळजी वाटत होती मला त्यांची
मी भरभरून दिले
आशिर्वाद सगळ्यांना
खुश झालो त्यांच्या भक्तीवर
मागितले ते देऊन टाकले मीे त्यांना
दगाजी देवरे
Comments
Post a Comment