दु:खाचे मोजमाप
माणसाच्या आयुष्यांत सुख आणि दु:ख येतच असतात पण जरी दु:ख एक प्रकारचे असले तरी माणसांप्रती ते कमी जास्त वाटते. काहीना ते दु:ख क्षुल्लक वाटते तर काहींना ते मोठे वाटते .शेवटी माणसाच्या दृष्टिकोनावर त्याचे मोजमाप अवलंबून असते काही दु:खातून सहीसलामत बाहेर पडतात पण काही मात्र त्याच दु:खामुळे जीवन संपवतात किंवा नाउमेद होतात .काहीवेळा एखादे मोठे वाटणारे दु:ख छोटे वाटायला लागते कारण त्यापेक्षा मोठे दु:ख आलेले असते .समजा कुणाचा सासरा गेला तर ती सुन खूप रडते व दु:ख खूप झाले असे वाटल्याने खचून जाते पण काही दिवसांनी पती जातो मग पतीच्या दु:खापुढे ते दु:ख तिला अतिशय कमजोर वाटू लागते व खरे मोठे दु:ख तर हेआहे असे तिला वाटते मग काही दिवसांनी अपघाताने मूलगा जातो मग मुलापुढे पतीचे दु:ख कमी वाटू लागते अशाप्रकारे दु:खाची तिव्रता कधीही फिक्स नसते फक्त आलेल्या दु:खाला कसे सामोरे जातात यातच खरी कसोटी असते काही कसोटी पास होतात तर काही नापास .काही दु:खांना जीवनभर कुरवाळतात तर काही क्षणातच विसरून पुढचा मार्ग निवडतात व पुढे जातात शेवटी दु:खाची तिव्रता आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि दृष्टिकोन बनलेला असतो आपली संगत घरातील वातावरण तुमचे वाचन फिरणे तुमचे शिक्षण त्यामुळे विचार तसे बनतात व जसे विचार तशी कृती बाहेर येते.जीवनाचे नेमके सत्य कळले की आलेले कोणते दु:ख व सुख वाटत नाही .माणसाची स्थिती सम होते बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment