बेसावधपणा
जीवन जगत असताना सावधानता फार महत्वाची असते .मोठ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतात तेव्हा क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये .ज्या गोष्टीना आपल्या मते काडीचीही किंमत नाही त्याच गोष्टी आपल्याला अडसर ठरू शकतात म्हणून अशा क्षुल्लक गोष्टींसाठी सावध राहिलैले बरे .समजा आपल्याला 11वाजता मिटिंग आहे व त्या हिशोबाने घरातून निघालो व रिक्षाने स्टेशनपर्यंत जाण्याचा विचार केला व रिक्षावाल्याने स्टेशनला सोडले व भाडे झाले 18 रुपये .तुम्ही 20 रुपये दिले परंतू त्याच्याकडे दोन रूपये सुट्टे नाहीत तेव्हा त्याच्याशी भांडत होते मग वाईट शब्द बाहेर पडतात मग हाणामारी होते पोलीस येतात .पोलीस स्टेशनला नेतात केस दाखल होते व अशा गडबडीत महत्वाची मिटिंग जाते व उगीचच मनस्ताप सहन करावा लागला पण दोन रुपयाचा वाचार केला नसता तर रिक्षावाल्यानेही आशिर्वाद दिले असते व मिटिंगही सापडली असती म्हणून गोष्टी क्षुल्लक असतात पण सावधानता नसली तर आपल्याला ध्येयापासून रोखण्याची ताकत त्यांच्पामध्ये असते तसेच अनेक साधु लोक देवाच्या नामाने हा भवसागर तरून जाण्याची भाषा करतात लोकांना पटवतात .मोठा शिष्यवर्गही गोळा होतो मग एक दिवशी अशाच साधुंना सावधानता लक्षात येत नाही व त्यांचा पाय घसरतो व नको ते करून बसतात मग शिष्यवर्गही जातो व त्या मार्गावर एक अडथळा येतो बदनामीचा .गोष्ट साधी वाटते पण परिणाम भयंकर असतो म्हणून सावधानता फार आवश्यक असते.आपल्याला आपल्या गाडीने मित्रांच्या मुलीच्या लग्नाला पोहचायचे असते व आपण निघतो पण गाडी चालवतांना सावधानता बाळगली नाही तर अपघात होऊ शकतो व लग्नाला पोहचण्याऐवजी एकतर जेलमध्ये किंवा वरती ढगात पोहचू शकतो त्यामुळे सावधतेने मार्ग काढला तर आपले कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत होते त्यामुळे जे ही कार्य करायचे असेल तर मार्गात येणार्या अडचणीवर मात करून शांत चित्ताने मार्ग काढला पाहिजे नाहीतर ऐहिक सुखाला व तसेच पारमार्थिक सुखाला आपण मुकतो .बघा पटतं का?
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment