मिथ्या हा संसार
समजतो माणूस स्वत:ला श्रीमंत
आपल्याहून नाही कुणी श्रेष्ठ
पण क्षणातच चित्र पालटून जाते
अन् होतो जगातला सर्वात कनिष्ठ
गाडी पैसा नोकर चाकर
असते त्याच्या कायम जवळी
पण वेळ येते ती अशी
की काहीच नसते त्यावेळी
स्थिर भासणारा हा संसार
क्षणातच मोडून पडतो पटदिशी
कधीच विचार नसतो केलेला
होईल असे एखाद्या दिवशी
कधी येतो महापूर
तर कधी येतो भुकंप
कधी होतो अपघात
होतो माणूस कायमचाच गडप
आज असणारी व्यक्ती
उद्याअसेलच याची नाही शाश्वती
आहे सारे मृगजळ
तरी माणूस दंभ कायम राखती
मिथ्या म्हणूनही जगणे
मात्र सुटत नाही
भूक लागली भरपूर
तर मिथ्या वाटते खरे बाई
प्रेमाची माणसे भेटली की
जीवन वाटायला लागते सुंदर
खूप खूप जगावं
मग मिथ्या जाते पळून दूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment